विद्यार्थ्यांनो परीक्षेला हसतमुखाने सामोरे जा…कपील ठाकूर

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : नुकतीच बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे पालकांच्या अती अपेक्षा दुसऱ्याच्या मुलाची तुलना व व स्वतःच्या इच्छा आकांक्षा मुलांवर लादने यामुळे विद्यार्थी ताण ताणावाच्या स्थितीत परीक्षेला जातात व दडपणाच्या ओझ्याखाली परीक्षेच्या सेंटरवर नको ती चूक करून परत येतात परंतु तसे न करता हसत मुखाने कोणत्याही दडपणाच्या ओझ्याखाली न जाता टेन्शनमध्ये न येता धैर्याने परीक्षेला सामोरे जा असा सल्ला विद्यार्थ्यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांनी दिला इयत्ता दहावी व बारावीच्या गुणपत्रिका म्हणजे सर्व काही नसते विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांच्या आवडी निवडी बद्दल व त्यांचा कल कशामध्ये आहे हे ओळखणे गरजेचे आहे तेव्हाच ते प्रगतीच्या पथावर जाऊ शकतात व विद्यार्थी देशांमध्ये त्यांना त्यांच्या आवडीचा एक तरी खेळ खेळू द्या म्हणजे त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती येऊन भविष्यात चुकीचे निर्णय घेणार नाही