अखंड गरजवंत मराठा समाज जिल्हा बैठक संपन्न.
दिनांक ११ मार्चला आत्मक्लेष धरणा आंदोलनाचे आयोजन.
अकोला./ प्रतिनिधी
अकोला जिल्हा अखंड गरजवंत मराठा समाजाची तातडीची बैठक दिनांक ५ / मार्च 2025 बुधवारला मराठा सेवा संघ कार्यालय अकोला येथे पार पडली. या बैठकीमध्ये मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ही केस जलद गती न्यायालयात चालवण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज , जिजाऊमाता या व इतर महापुरुषांची बदलामी केल्याबद्दल तसेच धार्मिक भावना दुखावल्याबद्दल जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याबद्दल नागपूर येथील प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी.तसेच महापुरुषांच्या बदलामी करणाऱ्या चित्रपट, नाटक ,लेख, कविता, तसेच भाषणे याच्यावर बंदी घालण्यात यावी जो कोणी हे कृत्य करीत आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासह विविध मागण्यासाठी अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दिनांक 11 मार्च 2025 मंगळवारला सकाळी १० वाजता आत्मक्लेष धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तसेच शासनाच्या वेळ काळू धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटन बांधणी चे नियोजन करण्यात आले प्रत्येक जिल्हा तालुका व गाव पातळीवर मराठा सेवकांच्या नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते देवराव पाटील हागे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये अखंड गरजवंत मराठा समाजाचे संयोजक राजेश देशमुख, समाजसेवक गजानन हरणे, पाटील समाजाचे ज्येष्ठ नेते प्रदीप खाडे,अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर, मराठा महासंघाचे राम मुळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रदीप चोरे, पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, मराठा योद्धा राजू पाटील शिंदे, श्रीकांत देशमुख, हिम्मत पोहरे, प्रकाश भिकनकडे, सतीश गावंडे, जयंत वाघ, पूर्णाजी पाटील, विजय गावंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित राहून बैठकीला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर गावंडे तर आभार प्रदर्शन अक्षय भांगे यांनी केले. या बैठकीला जिल्ह्यातील अखंड सकल गरजवंत मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. होऊ घातलेला धरणे आंदोलनात अकोला जिल्ह्यातील जागरूक मराठा पाटील देशमुख कुणबी समाजाच्या व परिवर्तनवादी बहुजन विचाराच्या नागरिकांनी महिलांनी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.