हटके

डर के आगे जीत है… कुत्र्यांनी पाडला बिबट्याचा फडशा 

Spread the love

                       जगंलात  हिंस्त्र आणि ताकदवान प्राणी राहतात. एकदा का शिकार यांच्या टप्प्यात आली तर मग हे समोरच्या प्राण्यांचा करेक्ट गेम करतात. हिंस्त्र पशुत वाघ, सिंह, बिबट्या हे शिकारी साठी ओळखले जातात. यांच्या तावडीत सापडल्या नंतर मात्र जीवाचा काही भरवसा नसतो. परंतु सगळेच दिवस सारखे नसतात. बाजू पलटायला काही वेळ लागत नाही. अशीच घटना य व्हिडिओत कैद झाली आहे. 

तुम्ही बिबट्याने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मात्र बिबट्याची शिकार केलेला व्हिडीओ कधी पाहिलाय का ? तेही कुत्र्यांनी ?’शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात अक्षरश: बिबट्याला फाडून टाकलंय.

जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं

बिबट्याच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे बिबट्याच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत काही कुत्र्यांनी केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या कुत्र्यांनी जंगलातल्या चक्क विशाल प्राण्याला आस्मान दाखवलंय. फक्त एवढंच नाही तर पार फाडून टाकलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.

हा सगळा थरारक प्रकार एका व्हिडीओत रेकॉर्ड झाला आहे. सोशल मीडियावर @TheBrutalNature नावाच्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close