आकाशात दिसले एलियन चे स्पेसशिप, लोकांनी केले कॅमेरात कैद

जगात एलियन्स (पर ग्रहावरील प्राणी ) आहेत किंवा नाही यावर अनेक वेळा चर्चा आणि वाद होतात. काही लोक एलियन असल्याचा दावा करतात तर काही याला नुसत्या अफवा म्हणतात. पण सोशल मीडियावर सध्या एका रहस्यमयी घटनेने नोंद घेतली आहे, जी वेगाने आता सर्वत्र शेअर केली जात आहे. एलियन्सच्या अनेक गोष्टी तुम्ही आजवर ऐकल्या असतील मात्र वास्तवात तुम्ही कधी त्यांना पाहिले आहे का?
नसेल तर आता तुम्हाला ते पाहता येणार आहे कारण सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एलियन्सचे स्पेसशिप अवकाशात उडताना दिसून आले. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
ही घटना सोमवारी मध्यरात्री घडून आली, अवकाशात अचानक एक गोल तेजमय प्रकाश फिरताना दिसला. त्यामुळे लोकांमध्ये एलियन्सच्या आगमनाचा भ्रम निर्माण झाला होता. लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रेटर मँचेस्टर, डर्बीशायर आणि यॉर्कशायरसह इंग्लंडच्या विविध उत्तरेकडील भागात हे फिरते चाक दिसून आले.
या घटनेचे साक्षीदार असलेल्या लोकांनी विविध मीडिया हाऊसला सांगितले की आकाशात अंधुक प्रकाशाने वेढलेला एक विचित्र फिरणारा प्रकाश दिसला. जे रात्री गायब होण्याआधी आकाशात हळू हळू फिरत होते. लोकांनी या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. ज्यात रहस्यमयी पद्धतीने फिरणाऱ्या प्रकाशाचा उल्लेख करण्यात आला. व्हिडिओ शेअर करताना लोकांनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आकाशात हे इतर कोणी पाहिले आहे का?”.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रहस्यमय फिरणारा प्रकाश अधिकृतपणे स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटशी जोडला गेला होता, जो केप कॅनाव्हरल, फ्लोरिडा येथून यूएस नॅशनल रिकॉनिसन्स ऑफिस (NROL-69) च्या मिशनवर प्रक्षेपित झाला होता. लिफ्टऑफनंतर, जादा इंधन अवकाशात सोडण्यात आले, जे आकाशात घनरूप झाले आणि सूर्यप्रकाश पकडला, ज्यामुळे यूकेमधून चित्तथरारक दृश्य दिसून आले. मेट ऑफिसने सांगितले की, “रॉकेट आइस क्लाउड्स” म्हणून ओळखली जाणारी ही घटना यापूर्वी 2023 मध्ये स्पेसएक्सच्या दुसऱ्या प्रक्षेपणानंतर यूएसच्या काही भागांमध्ये दिसली होती. “रॉकेटचा गोठलेला एक्झॉस्ट लेयर वातावरणात फिरताना दिसतो आणि सूर्यप्रकाश परावर्तित होताना दिसतो, ज्यामुळे ते आकाशात सर्पिलसारखे दिसते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.