ब्रेकिंग न्यूज

रस्त्याच्या कारणावरून उद्भवला वाद ; तिघांनी मिळून एकाला जीवनातून केले बाद 

Spread the love
 पवनार येथील घटना
पवनार ( वर्धा) /  प्रतिनिधी  :
                       सार्वजनिक वापराच्या रस्त्यावरून येणे जाणे करण्या वरून सुरजुसे आणि हजारे कुटुंबात नेहमी खटके उडत होते. घटनेच्या दिवशी (मंगळवार) याच कारणावरून या दोन्ही कुटुंबात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात प्रमोद सुरजुसे (४०)  याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली . त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. आज उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
.सुनीता सुरजुसे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार त्यांचा दीर प्रमोद त्यांचे घराशेजारी परिवारासह राहत असून त्यांचे घराशेजारी दिलीप नागोजी हजारे यांचे घर आहे.घरासमोर हजारे यांचा नातू खेळत असताना प्रमोद सुरजुसे गाडीने जात असताना या रस्त्याने गाडी नको नेऊ म्हणून हटकले.परंतु जायचा रस्ता तोच असल्याने प्रमोद हा त्याच रस्त्याने जाणे येणे करीत होता.मंगळवार तारीख २५ ला संध्याकाळी साडे सात चे सुमारास दिलीप हजारे यांचा नातू घरासमोर खेळत होता व दिलीप हजारे,त्यांचे मूल स्वप्नील व विशाल यांचे समवेत खाटेवर बसून होते त्याच दरम्यान प्रमोद सुरजुसे हा जात असताना तुला अडवून बाचाबाची केली.बाचाबाची चे रूपांतर हाणामारीत झाले.स्वप्नील हजारे याने लाकडी काठीने प्रमोद चे डोक्यावर प्रहार केला व इतरांनी लाथा बुक्याणी मारले.प्रमोद चे कुटुंबीय मध्ये पडून त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र प्रमोद ला गंभीर दुखापत झाल्याने व डोक्यातून रक्त निघत असल्याने लगेच त्याला सेवाग्राम इस्पितळात दाखल केले.मात्र आज दुपारी चार वाजता त्याचा इस्पितळात मृत्यू झाला.आरोपी दिलीप हजारे (५९),स्वप्नील हजारे (३५) विशाल हजारे (३०) यांचेवर काल भारतीय न्याय संहिता अंतर्गत ११८(१),३५१(२),३५१(३),३(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आज प्रमोद चा मृत्यू झाल्याने खुनाचा सुद्धा गुन्हा दाखल झाला.तीनही आरोपींना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.प्रमोद चे जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close