हटके

कॉलेज ला गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या तरुणीची 14 तासानंतर आली बातमी

Spread the love

कॉलेज साठी निघालेली 19 वर्षीय तरुणी घरी पोहोचलीच नाही, 14 तासानंतर आली बातमी

पुणे /विशेष प्रतिनिधी

ती रोज च्या सारखी कॉलेज ला गेली. पण.परतण्याचा वेळ होऊन देखील परतली नाही. कुटुंबियांना काळजी वाटू लागली. मुलीच्या मोबाईल वर कॉल केल्यावर तो स्विच ऑफ दाखवू लागला. त्यांनी मुलीच्या शोधात सरळ कॉलेज गाठले.पण मुलीचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी सरळ पोलिस स्टेशन गाठत मुलीच्या मिसिंग ची तक्रार नोंदवली. घटनाक्रम पाहून पोलिसही चक्रावले. त्यांनी सुद्धा शोध घेतला पण काही केल्या पता लागेन. शेवटी मुलीला शोधून दमलेल्या आणि चिंतेत असलेल्या कुटुंबाला मुलीचाच कॉल आला.आणि कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला. वास्तविक मुलगी जेव्हा घरी जायला निघाली तेव्हा ती ज्या लिफ्ट ने खाली येत होती ती लिफ्ट बंद पडल्याने ती त्यात अटकून राहिली. मोबाईल ची बॅटरी डाउन झाल्याने तिला घरी फोन देखील करता आला नाही.

पुण्यात वाघोलीत राहणारी 19 वर्षीय तरुणी नेहमी प्रमाणे सकाळी कॉलेजला गेली. पण दुपारी ती घरी आली नाही. तिचा फोनही बंद येत होता. पालकांनी तिचा शोध घेतला पण मध्यरात्र होऊ गेली होती. तरीही लेकीचा शोध लागत नव्हता. अशात पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुरुवारी पहाटे 14 तासानंतर लेकीसोबत घडलेल्या घटनेमुळे पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलीसही तरुणीची अस्वस्था पाहून हादरले.

नेमकं तरुणीसोबत काय घडलं?

पुण्यातील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणीसोबत कॉलेजमध्ये भयानक घटना घडली. कॉलेज संपल्यानंतर नेहमीप्रमाणे ती घरी जात असताना तिने लिफ्टमध्ये प्रवेश केला. पण या लिफ्टमध्ये तिने कधी विचारही केला नसेल अशी भयानक घटना घडली. ती तरुणी लिफ्टमध्ये अडकली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला, पण कोणालाही ती लिफ्टमध्ये अडकल्याचे समजलं नाही. काही सेकंदवरून मिनिटं आणि तास झालेत. तरुणी लिफ्टमध्ये बाहेर पडण्यासाठी आटापीटा करत होती. पण तिला मदत मिळाली नाही. तिचा फोनही बंद झाला. तरुणी तब्बल 14 तास त्या लिफ्टमध्ये होती

तरुणीची 14 तासांनंतर लिफ्टमधून सुटका कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी वाघोलीतील रहिवाशी होती. बुधवारी (18 नोव्हेंबर 2026) ला तिच्यासोबत कॉलेजमध्ये धक्कादायक घटना घडली. बुधवारी कॉलेज संपल्यावर दुपारी  3.30 वाजताच्या सुमारास ती घरी जाण्यासाठी निघाली. ती लिफ्टमध्ये एकटीच होती. अचानक लिफ्ट पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान वीजपुरवठा बंद झाल्यामुळे ती अडकली.  लिफ्ट बंद पडल्यानंतर ती घाबरली आणि तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. पण तिचा आवाज कोणालाही पोहोचला नाही. तिने मोबाईलवरून पालकांना फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी तिचा संपर्क झाला नाही. त्यानंतर मोबाईलची बॉटरीही संपल्यामुळे तोही बंद पडला.

आता तरुणीच्या घरी नेहमीच्या वेळेत लेक घरी पोहोचली नाही. त्यात तिला फोन लावला तर तोही लागत नव्हता त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पालकांनी पहिले कॉलेजचा परिसर लोणी काळभोर गाठलं आणि तिथे तिचा शोध घेतला. आता मध्यरात्र होऊन गेली होती, पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसांकडे तक्रार केली. अन्न, पाणी आणि लाइट पण नव्हते, 14 तास झाले होते. गुरूवारी पहाटे कॉलेजमध्ये वीजपुरवठा पुरवत झाला आणि लिफ्ट सुरु झाली. एका महिलेने लिफ्टचं बटण दाबलं.  लिफ्टचा दरवाजा उघडताच महिलेने त्या तरुणीला पाहिलं आणि तिची बंद पडलेल्या लिफ्टमधून अखेर सुटका झाली. मुलीने आई-वडिलांना संपर्क करून झालेला प्रकार सांगितला.

महाविद्यालय सुरक्षा व्यवस्था, लिफ्टची देखभाल आणि आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. महाविद्यालय प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close