चीन ची दुटप्पी भूमिका उघड, जगात खळबळ

पश्चिम आशियात नेहमीच काहीतरी होत असतं. इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे या भागात सध्या मोठी अस्थिरता निर्माण झालेली आहे. हे युद्ध संपावे म्हणून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातायत.
परंतु अद्याप हे युद्ध थांबलेले नाही. या युद्धात हुती बंडखोरांचा इराणला पाठिंबा आहे. याच भूमिकेतून हुती बंडखोरी सौदी अरेबियावर हल्ले करत आहे. इराणच्या युद्धात भारताने नेहमी शांततेचा पुरस्कार केलाय. चीनची भूमिका मात्र पहिल्यापासूनच संदिग्ध स्वरुपाची राहिलेली आहे. असे असतानाच आता जगाला धक्का देणारी माहिती समोर आली आहे. चीनकडून हुती बंडखोरांना पाठिंबा दिला जात आहे, असा दावा केला जातोय.
नेमकी काय माहिती समोर आली?
हुती बंडखोरांनी नेहमीच इराणला पुरक असणारी भूमिका घेतलेली आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून हुतींनी सौदी अरेबियावर अनेक हल्ले केलेले आहेत. याच हल्ल्यांमध्ये वापरल्या जाण्या मिसाईल्समद्ये चीनी सामानाचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही बाब समोर येताच संपूर्ण पश्चिम आखातात खळबळ उडाली आहे. याआधी सौदी अरेबियातर्फे चिनी मिसाईल्सचा वापर करण्यात आला होता, असा रिपोर्ट समोर आला होता.
चीन जर हुती बंडखोरांना मदत करत असेल तर…
सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुती बंडखोरांमधील संघर्ष हा फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा एक जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरलाय. या संघर्षात भू-राजकीय प्रतिस्पर्धा, आधुनिक शस्त्रांचा वापर यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जातेय. चीन जर हुती बंडखोरांना मिसाईल निर्मितीसाठी सुटे भाग देत असेल किंवा चीनने निर्माण केलेले सुटे भाग हुती बंडखोरांपर्यंत पोहोचत असतील तर सौदी अरेबिया आणि चीन यांच्यातील दृढ होत असलेल्या संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
चीनची नेहमीच दुटप्पी भूमिका
दरम्यान, चीनची आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमहीच दुटप्पी भूमिका राहिलेली आहे. युंगाडा येथील पीएमएल डेली या वृत्तसंस्थेनुसार चीन हा सौदी अरेबियाचा महत्त्वाचा भागिदार आहे. चीनकडून सौदी अरेबियातील तेल मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. या दोन्ही देशांनी आपापले हितसंबंध जोपासलेले आहेत. असे असताना सौदी अरबियाच्या शत्रूने वापरलेल्या मिसाईलमध्ये चीनमध्ये निर्माण झालेले सुटे भाग आढळून आल्याने पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
