अपघात

वडिलां पाठोपाठ मुलाचाही मृत्यू ,तर्पण विधी करून परतत असताना झाला होता अपघात 

Spread the love

विशेष प्रतिनिधी / पंचवटी 

                     तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलाचा तर्पण विधी करून परतत असताना  अपघातात होऊन गंभीर जखमी झालेल्या पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे. 

या अपघातात प्रसिद्ध हिंग व्यापारी किरीटभाई ठक्कर (वय ६७) यांचे शुक्रवारी (दि. २) निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (दि. ३) पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार सुरू असतानाच अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा कार्तिक ठक्कर (वय ३८) यांचीही प्राणज्योत मालवली.

ठक्कर कुटुंबीय बिहारमधील गया येथे धार्मिक विधी आटोपून गुजरातमधील अंजार या मूळ गावी गेले होते. तेथून नाशिकला परतत असताना त्यांच्या कारची उभ्या मालट्रकला धडक बसून अपघात झाला. यात किरीटभाई ठक्कर यांचा मृत्यू झाला. त्यात गंभीर जखमी असलेला त्यांचा मुलगा कार्तिक यांच्यावर उपचार सुरू होते.

किरीटभाई यांच्यावर पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार सुरू असतानाच पुत्र कार्तिक यांचीही प्राणज्योत मालवली. तीन वर्षांपूर्वी मुलगा कृतिक याच्या निधनाच्या दुःखातून ठक्कर कुटुंबीय अद्याप सावरले नव्हते. त्यातच या अपघाताने कुटुंबावर पुन्हा मोठा आघात झाला. पितापुत्रांच्या मृत्यूने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांवर शोककळा पसरली आहे. नाशिकमधील प्रसिद्ध हिंग व्यापारी म्हणून किरीटभाई ठक्कर परिचित होते.

दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी सिनेमागृहामागील लोकसहकार नगर येथे ते पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसह राहत होते. गेल्या आठवड्यात २६ सप्टेंबर रोजी ते मुलगा कार्तिक आणि दोन चुलत भावांसह तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या मुलगा कृतिकच्या तर्पण विधीसाठी गया-बोधगया येथे गेले होते. कार्तिक यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

चारचाकीच्या धडकेत व्यावसायिकाचा मृत्यू

दुसरीकडे, कॅनडा कॉर्नर परिसरातील वसंत मार्केटजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या प्रसिद्ध टेलिकॉम व्यावसायिक हेमंत चंद्रनारायण राठी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस तपास सुरू आहे.

पोलिसांकडील माहितीनुसार, हेमंत चंद्रनारायण राठी (वय ६७, रा. सुरभी बंगला, शिर्के मळा) यांचे कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केट परिसरात इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम व्यवसायाचे दुकान आहे. २९ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास वसंत मार्केटजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.

अपघातानंतर ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. नागरिकांच्या मदतीने त्यांना प्रथम लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या अपघातानंतर कॅनडा कॉर्नर परिसरातील रस्त्यांची स्थिती आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात स्मार्ट सिटी तसेच विविध विकासकामांच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदकामे सुरू आहेत. मात्र, ही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खोदकाम झालेल्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेड्स, इशारा फलक, रेडियम मार्किंग आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. रस्त्यांची दुर्दशा, पार्किंगची कमतरता आणि वाहतुकीचे अपुरे नियोजन यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडतानाही जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close