क्राइम

लव्ह ट्रँगल, पोलिसांची दिशाभूल आणि सत्य समोर 

Spread the love

महू / विशेष प्रतिनिधी

                   पहाटेची वेळ पोलिस कर्मचारी रात्रीची गस्त आटपून पहाटे गरम चहाचा आस्वाद घेत होते. इतक्यात आपत्कालीन 112 नंबर ची बेल वाजली. ड्यूटी अंमलदाराने झटक्यात फोन उचलून हॅलो पोलिस स्टेशन असे म्हणताच समोरून एक महिला घाबरलेल्या आवाजात सांगू लागली की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिच्या नवऱ्याच्या खून केला आहे.

त्याने थेट तिच्या पतीच्या छातीत चाकू भोसकला आणि पळ काढला, अशी माहिती तिने दिली. कॉलवरून माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले तिथे एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता.

सुरुवातीला हा सर्व प्रकार दरोड्याचा किंवा एखाद्या अनोळखी मारेकऱ्याचा हल्ला असावा, असाच पोलिसांचा अंदाज होता. मात्र, तक्रारदार महिलेची चौकशी करताना पोलिसांना तिच्या जबाबावर संशय आला. तिच्या बोलण्यात अनेक विसंगती आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी तातडीने तिच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासले. त्या एका तांत्रिक तपासाने संपूर्ण प्रकरणाला वळण दिलं आणि या बनावामागचं ‘लव्ह ट्रँगल’ उघडं पडलं.

कॉल डिटेल्सने कसा उलगडला लव्ह ट्रँगल?

उत्तर प्रदेशातील मऊ मध्ये ही घटना घडली. तक्रारदार महिला शहजादी हिने मृत व्यक्तीला आपला पती असल्याचं सांगितलं होतं. मात्र, मोबाईल डिटेल्सवरून मृत तरुण तिचा पती नसून असगर अली असल्याचे स्पष्ट झालं. असगर हा तिचा पहिला प्रेमी होता. शहजादी गेल्या अडीच वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत होती. ती असगरसोबतच राहत होती. तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. घटनेच्या आधी आणि नंतर ती मुंशीपुरा येथील आकाश राव नावाच्या तरुणाच्या सतत संपर्कात होती. आकाश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
असगरसोबत वाद सुरू झाल्यानंतर शहजादीच्या आयुष्यात आकाशची एंट्री झाली होती. या नव्या नात्याला असगरने जोरदार विरोध केला. त्यावरून त्यांच्यात सतत वाद सुरू झाले. अखेर असगरला मार्गातून हटवण्यासाठी शहजादी आणि आकाशने त्याच्या हत्येचा कट आखला.

शहजादीने हत्याकांड कसं घडवलं?

कटाची आखणी करून शहजादीने आधी कांशीराम कॉलनीत एक खोली भाड्याने घेतली. त्यानंतर तिने असगरला तिथे बोलावून घेतले. 3 ऑगस्टच्या पहाटे असगर गाढ झोपेत होता. त्याच वेळी आकाश राव त्याचा मित्र सूरजला घेऊन तिथे पोहचला. सूरजने असगरचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले. शहजादीने त्याचे तोंड दाबले, जेणेकरून तो आरडाओरडा करू शकणार नाही. याच संधीचा फायदा घेत आकाशने चाकूने थेट असगरच्या छातीवर वार केले आणि त्याचा जागीच जीव घेतला. हत्त्येनंतर दोघेही स्कुटीवरून पसार झाले. यानंतर शहजादीने स्वतःला वाचवण्यासाठी 112 वर फोन केला आणि अनोळखी मारेकऱ्याची खोटी कथा रचली.

पोलीस कारवाई व सद्यस्थिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शहजादी आणि सूरज या दोघांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली स्कुटी जप्त करण्यात आलेली आहे. मुख्य आरोपी आकाश राव सध्या फरार असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close