क्राइम

तरुणीने प्रियकरा सोबत केला कुटुंबातील तिघांचा खून 

Spread the love
लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या तरुणीला होता कुटुंबीयांचा विरोध
                    प्रियकरा सोबत लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या तरुणीला तिच्या या नात्याबद्दल घरच्यांचा विरोध होता.कुटुंबीय तिला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅट वर गेले असता त्यांच्यात वाद झाला आणि त्या दोघांनी मिळून तरुणी ची आई, वडील आणिं लहान बहीणीला चाकूने वार करत संपवले. या नंतर दोघे पसार झाले आहेत.
श्वेताच्या लिव-इन रिलेशनशिपला आई-वडिलांचा विरोध
प्राथमिक तपासानुसार, सोमसुंदर, त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी आणि त्यांची धाकटी मुलगी सुप्रिया हे मोठी मुलगी श्वेताच्या घरी गेले होते. श्वेता तिचा प्रियकर केनेथ याच्यासोबत सीगेहल्ली परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. आई-पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेताच्या लिव-इन रिलेशनशिपला तिच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. सोमवारी देखी याच कारणावरून सोमसुंदर आणि श्वेदे यांच्यात जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादानंतर श्वेता आणि तिचा प्रियकर केनेथ यांनी कथितपणे तिचे वडील, आई आणि बहिण यांच्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या केली, असा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तिघांवरही अनेक वेळा चाकूने वार
या घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख सोमसुंदर (वय 52), त्यांची पत्नी मुथुलक्ष्मी (वय 48) आणि धाकटी मुलगी सुप्रिया (वय 19) अशी करण्यात आली आहे. तिघांवरही अनेक वेळा चाकूने वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच के. आर. पुरम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन ते ईस्ट पॉइंट रुग्णालयात पाठवण्यात पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुर गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही घटना सोमवारी रात्री के. आर. पुरम पोलीस आले ठाण्याच्या हद्दीतील सीगेनाहल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये घडल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संबंधित तरूणी गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या प्रियकरासोबत राहत होती. सोमवारी संध्याकाळी पीडित कुटुंबीय त्या फ्लॅटवर गेले होते जिथे हे जोडपे राहत होते. तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, भेटीदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्यानंतर तिघांवर वार करण्यात आले. या प्रकरणानंतर आरोपी श्वेता आणि तिचा प्रियकर केनेथ हे घटनास्थळावरून फरार झाले आहेन पोलिसांकडून दोघांचा शोध घेण्यासाठी प्रर सुरू असून या हत्याकांडामागील सर्व परिस्थिती आणि नेमका घटनाक्रम उघड करण्यासाठी तपास सुरू आहे. बेंगळुरूमधील के. आर. पुरम परिसरातून हे धक्कादायक तिहेरी हत्याकांड समोर आले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close