क्राइम

TCS प्रकरणाची मुंबईत पुनरावृत्ती ? 

Spread the love
 
मुंबई / विशेष प्रतिनिधी 
 

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण ताजे असतानाच, आता मुंबईतही तसाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १९ वर्षीय तरुणीला अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाठवून तिचा मानसिक छळ करणाऱ्या अश्रफ सिद्दिकी नावाच्या तरुणाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मुंबई पालिका प्रभाग क्रमांक २०१ च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती समोर येत आहे.

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे मुंबईतील एका छोट्या कंपनीत टेलिकॉलर म्हणून काम करत होते. २१ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या दरम्यान आरोपी अश्रफ सिद्दिकी याने नोकरीसाठी मुलाखतीला आलेल्या मुलींचे मोबाईल नंबर मिळवले होते. या नंबरचा वापर करून तो मुलींना टार्गेट करत होता.

व्हॉट्सॲपवर अश्लील मजकूर पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली होती. धक्कादायक म्हणजे, मेसेजमध्ये त्याने मला हिंदू मुलीच आवडतात असे विधान करत तिचा मानसिक छळ केला. केवळ मेसेजवर न थांबता आरोपीने या तरुणीचा पाठलाग केल्याचे समोर आले आहे. आरोपीने केवळ एकाच तरुणीला नाही, तर इतर ३ ते ४ हिंदू मुलींनाही अशाच प्रकारचे अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले होते. भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी या घटनेवर कॉर्पोरेट जिहादचा आरोप केला आहे. तसेच अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणानंतर पीडित तरुणीने न डगमगता आपल्या वडिलांसह आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी अश्रफ सिद्दिकी याला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५४ आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर शिवसेना नेत्या आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. हे जे काही घडतंय ते अत्यंत चुकीचे आहे. मुलींना जाळ्यात ओढण्याचे हे प्रकार थांबले पाहिजेत. जर एखादी तरुणी प्रतिसाद देत नसेल, तर तिला असा त्रास देणे हे नीच मानसिकतेचे लक्षण आहे. पोलिसांनी ज्या तत्परतेने आरोपीला अटक केली, त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. पालकांनी आणि मुलींनी न घाबरता अशा नराधमांविरोधात समोर येऊन तक्रार करावी, आम्ही आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहोत, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. या प्रकरणाचा अधिक तपास आग्रीपाडा पोलीस करत आहे. तसेच आरोपीने अजून किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याचा शोध घेतला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close