सामाजिक

चार तरुणांना जलसमाधी , उकाड्याने त्रासून गेले होते पोहायला

Spread the love

छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी

                उकाड्याने त्रासलेल्या तरुणांना तलावात पोहायला जाणे चांगलेच आंगलात आले आहे. तलावात बुडून चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे अनेकजण तलाव, विहीर किंवा नदीत पोहण्यासाठी जातात. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टी असल्याने काही तरुण हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, हीच सुट्टी त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला तीन तरुण तलावात बुडाल्याची माहिती मिळाली होती. बचाव पथकाने शोधमोहीम राबवत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर तलावाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्याने पुन्हा शोधकार्य करण्यात आले आणि चौथ्या तरुणाचाही मृतदेह पाण्यात आढळून आला.

या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांपैकी अफान खान आणि आदिल शेख अशी दोघांची ओळख पटली असून उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त होत असून, पोहण्यासाठी जाताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close