अजब गजब

पबजी गेम खेळताना २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Spread the love

मेरठ / विशेष  प्रतिनिधी 

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये कोरियन गेमसाठी ३ सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता मेरठमध्ये भयंकर घटना घडली. मेरठमध्ये पब्जी गेम खेळताना तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाला पब्जी गेमचं अतकं व्यसन लागले होते की तो तासंतास गेम खेळायचा. मध्यरात्री पब्जी गेम खेळताना तरुणाच्या डोक्यातील नस फाटली. मेंदूत रक्तस्राव होऊन तरुणाचा मृत्यू झाला. तरुणांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्याचा रक्तदाब ३०० च्यावर गेला होता. रुग्णालयात दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरनगर गुलर वाली गली येथील रहिवासी असलेले प्रॉपर्टी डीलर फारूक यांचा २२ वर्षीय मुलगा मोहम्मद कैफ शुक्रवारी रात्री हेडफोन लावून मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. पहाटे ३ वाजता गेम खेळत असताना कैफ बेडवरून खाली पडला. कुटुंबीयांना हे कळताच त्यांनी त्याला रुग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा रक्तदाब ३०० च्या पुढे गेला होता. त्याची प्रकृती गंभीर पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला दिल्लीला रेफर केले.

दिल्लीतील रुग्णालयात दोन दिवस उपचार घेतल्यानंतर रविवारी सकाळी कैफचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. कैफचा मेहुणा शाहिद म्हणाला की, कैफ कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. ब्लडप्रशर वाढल्याने मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे कारण डॉक्टरांनी सांगितले. पब्जी गेममुळे फारूक यांचा एकुलता एक मुलगा देखील त्यांना कायमचा सोडून गेला.

कैफच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कैफच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कैफला मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याची आवड होती. तो मोबाईलवर पब्जी गेम खेळायचा त्याआधी तो रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करायचा. वडील फारूक यांनी सांगितले की, कैफला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. तो सतत मोबाईलवर हिच गेम खळायचा. तो रात्रभर मोबाईलवर पब्जी गेम खेळायचा. अनेक वेळा कुटुंबातील सदस्यांनी त्याला पब्जी गेम खेळू नको यासाठी ओरडा देखील दिला होता पण तरी देखाी त हे करण्यापासून मनाई केली पण तो ऐकत नव्हता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close