विशेष

अस काय आहे त्या व्हिडिओत ? 

Spread the love

बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या बायकोचा व्हिडिओ व्हायरल 

        बायकोच्या त्रासाला कंटाळून टीएस व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मानव शर्मा असे त्याचे नाव होते. आता मानव शर्माची पत्नी निकिता शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मानवच्या आत्महत्येच्या आधीचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे.

मी त्याच्यावर खूप प्रेम करते. माझ्या चुकीची जी शिक्षा मिळेल ती मला मान्य असेल. कारण मी चूक केलीय आणि खूप मोठी चूक केली. त्याने सतत विचारल्यानंतरही मी सांगितलं नाही. पण तो माझा भूतकाळ होता. मानवसोबत राहून मी कुठल्याच मुलाकडे पाहिलंसुद्धा नाही. मला दुसरं कोणीही माझ्या आयुष्यात नकोय असंही निकिता व्हिडीओमध्ये बोलताना दिसते.

निकिताने सांगितलं की, मी माझ्या आयुष्यातलं सगळं काही मानवला सांगितलंय. माझी चूक मला समजलीय. मी सगळं करायला तयार आहे. जेव्हा लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा मानवच्या वडिलांनी हुंडा मागितला नव्हता. कसलीच मागणी नव्हती. सगळे चांगले लोक आहेत. फक्त मीच चांगली नाही. जर मी आत्महत्या केली किंवा मला काही झालं तर यात कुणालाही जबाबदार धरू नये. आयएम सॉरी मानव मी चुकीची होते अशी माफी मागतानाही निकिता या व्हिडीओमध्ये दिसते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close