क्राइम
जरूड येथील गॅस कटर ने ए.टी.एम. फोडणाऱ्या आरोपींना एलसीबी अमरावती ग्रामीण ने केले जेरबंद
प्रतिनिधी मुबीन शेख. शिरजगाव कसबा
अमरावती ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन वरूड हदीत ग्राम जरूड येथील स्टेट बैंक ऑफ इंडीयाचे ए.टी.एम. अज्ञात चोरटयांनी दि. १२/०५/२०२३ चे रात्री दरम्यान गॅस कटरचे सहाय्याने कापून नगदी १६,००,०००/- रु चोरून नेले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वरुड येथे अप.क्र.२९३/२३ कलम ३७९, ४२७,३४ भादवी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे घटनास्थळी मा. अविनाश बारगळ पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. तसेच पोलीस निरीक्षक तपन कोल्हे गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी भेट देवून गुन्हा उघडकिस आणने करीता सूचना दिल्या होत्या.
गुन्हयाचे संदर्भात गोपनिय माहीती प्राप्त झाली होती. की, गुन्हयात वापरलेले चारचाकी वाहन हे दोन दिवसापूर्वी बैतुल मध्यप्रदेश येथे तसेच घटनेच्या दिवशी वरुड शहरामध्ये फिरत होते. यासंदर्भात तांत्रीक तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांना गोपनिय माहीती मिळाली की, अशाप्रकारचे गुन्हे मध्यप्रदेश व हरयाणा राज्यातील काही गुन्हेगार करतात त्यावरुन सि.सि.टी.व्ही. फुटेज चा माग काढुन परवल हरयाणा येथे जाउन शोध घेतला असता एक आरोपी ग्राम उतावल जि.परवल हरियाणा तसेच दुसरा आरोपी बैतुल येथून ताब्यात घेण्यात आला. सदर आरोपीतांना गुन्हयाचे अनुषंगाने विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, आणखी तिन आरोपी असुन ताब्यातील आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेली मारुती सुझुकी स्विप्ट कार लाल रंगाची बिना क्रमांकाची जप्त करण्यात आली असून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करुन ईतर आरोपी तांचा कसोशिने शोध घेणे सुरु आहे.
आरोपीचे नाव. १)कालीराम लक्ष्मण नागले वय.३५ वर्ष रा. चकोर ज़ि. बैतूल.२) कैलाश इंदल पाल वय ४३ वर्ष रा. वारीच ज़ि. बैतूल
सदरची कार्यवाही मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण. डॉ. निलेश पांडे उप विभागीय पोलीस अधिकारी मोर्शी , तपन कोल्हे पोलीस निरीक्षक. स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार पोलीस अंमलदार अंबक मनोहर, संतोश मुंदाणे, रविन्द्र बावणे, बळवंत दाभणे, सुनिल महात्मे, से.अजमत, अमोल केन्द्रे निलेश डांगोरे, युवराज मानमाटे, रवि व-हाडे, सागर नाथे चालक हर्षद घुसे, प्रमोद शिरसाट, राजेश सरकटे यांचे पथकाने केली.
पुढील तपास वरुड पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रदीप चौगावकर करीत आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1