क्राइम
गोवंश नेणारी पीकअप पलटी झाल्याने पकडल्या गेले तस्कर
मंगरूळ दस्तगीर / प्रतिनिधी
मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनं च्या हद्दीत येत असलेल्या बोरगाव धादे येथे कत्तली साठी जाणारे गोवंश आणि पीकअप गाडी सह 6,21, 000/ – चा मुद्देमाल जप्त
आशिक माहिती अशी की, मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीतं पिकअप क्र MH 38, X 3528 गाडी पलटी झाला असून त्यामध्ये गोवंश असल्याने मदतीची आवशकता असल्याचे कॉल करणाऱ्याने पोलीस स्टेशनचे डायल 112 चे वाहन क्र MH 27, DE 1713 चे एमडीटीवरकॉल करून मदतीची मागणी केली होती त्यामुळे ड्युटी वर असलेले पोहेकॉ निलेश जगन्नाथ राऊत हे काही कर्मचाऱ्यांना घेऊन घटना स्थळाकडे रवाना झाले.
अशा कॉलवरुन डायल 112 चे वाहनासह चालक मपोकाँ पुजा ब.न. 280 असे देवगाव- पुलगाव रोडने ग्राम बोरगाव धांदे विजय धांदे यांचे शेताजवळ गेलो असता घटनास्थळावर इन्टरा पिकअप क्र MH 38, X 3528 हा पलटी झालेला होता. व वाहनाचा चालक घटनास्थळावरुन पळुन गेला होता. इन्टरा पिकअप क्र MH 38, X 3528 मध्ये 12 गोवंशीय जनांवरांचे पायाला व तोडांला दोरीने घट्ट बाधुन निर्दयतेने कोंबलेली होती. 12 गोवंशीय जनावरे पैकी 6 गायी जागीच मरण पावल्या होत्या. 03 गायी व 03 गोरे हे जखमी अवस्थेत होते. वरुन सदर घटनेची माहीती मा. ठाणेदार सपोनि गौतम इंगळे सा. यांना फोनवर दिली. काही वेळाने ठाणेदार गौतम इंगळे सा., पोकाँ सतिश बन 75, पोकाँ जिवन बन 245, पोकाँ संदीप 2463, पोकाँ प्रभु ब.न. 1286, पोकाँ अमोल ब.न. 1225, चालक पोहेकाँ सुनिल ब.न. 2132 हे आले. घटनेची माहीती घटनास्थळ / जप्ती पंचनाम्यातील पंचाना दिली. पंचानी व आम्ही इन्टरा पिकअप क्र MH 38, X 3528 पाहणी केली असता गोवंशीय (गायी- गोरे) जनावरे दिसुन आली. इन्टरा पिकअप मध्ये गोवंशीय (गायी- गोरे) जनांवरांचे पायाला व तोडांला दोरीने घट्ट बाधुन निर्दयतेने कोंबुन कत्तलीकरीता नेत असल्याने आमची व पंचाची खात्री झाली. जखमी गोवंशीय (गायी- गोरे) जनांवरांचे उपचाराकरीता व मृत जनावरांचे पिएम करण्याकरीता तात्काळ पशुवैदयकीय अधिकारी तळेगाव दशासर यांना पत्रव्यवहार करुन बोलविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी तळेगाव यांनी जखमी जनावरांचा उपचार केला. व 06 मृत जनावरांचे पिएम केले. 06 मृत जनावरांचे पिएम केल्यानंतर शासकिय जागेत पंचासमक्ष दफनविधी करण्यात आला. उर्वरित 06 गोवंशीय (गायी- गोरे) जनांवरांना पंचासमक्ष जप्त घटनास्थळ पंचनाम्याद्वारे जप्त करुन शासन निर्देशाप्रमाणे श्री गौवरक्षक संस्था र.नं. एफ 151 धामणगांव रेल्वे येथे सुरक्षेकरीता पंचासमक्ष पत्र देवुन गौवरक्षक संस्था धामणगांव रेल्वे र.नं. एफ 151 येथे नेवुन सर्व गोवंशीय (गोरे) जनावरे तेथे गोशाळा स्टाफ चे व पोलीस स्टाफ मदतीने ठेवण्यात आली. गोवंशीय (गायी- बोरे) जनांवरांचे वर्णन 1) एक मृत गाय पांढ-या रंगाची वय अदाजे 3.5 वर्ष शेपुट गोंडा काळा बिल्ला क्र 170071-491848 किमत अंदाजे 10000/ रु 2) एक मृत गाय पांढ-या रंगाची वय अदाजे 5 वर्ष शेपुट गोंडा काळा बिल्ला क्र 103456 – 959772 किमत अंदाजे 12000/ रु 3) एक मृत गाय पांढ-या रंगाची वय अदाजे 5 वर्ष शेपुट गोंडा किमत अंदाजे 12000/ रु 4) एक मृत गाय ब्राउन रंगाची वय अदाजे 6.5 वर्ष शेपुट गोंडा काळा बिल्ला क्र 103446-594181 किमत अंदाजे 15000/ रु 5) एक मृत गाय काळ्या रंगाची वय अदाजे 5 वर्ष शेपुट गोंडा काळा किमत अंदाजे 10000/ रु 6) एक मृत कालवड ब्राउन रंगाची वय अदाजे 7 महीने शेपुट गोंडा काळा किमत अंदाजे 6000/ रु 7) एक जखमी गाय पाढ-या रंगाची वय अदाजे 6 वर्ष शेपुट गोंडा काळा बिल्ला क्र 103455 132610 किमत अंदाजे 15000 रु 8) एक जखमी गाय पाढ-या रंगाची वय अदाजे 8 वर्ष शेपुट गोंडा काळा किमत अंदाजे 11000/ रु 9) एक जखमी गोरा पाढ-या रंगाचा वय अदाजे 2.5 वर्ष शेपुट गोंडा काळा किमत अंदाजे 10000/ रु 10) एक जखमी गोरा ब्राऊन रंगाचा वय अदाजे 8 महीने शेपुट गोंडा काळा किमत अंदाजे 7000/रु 11) एक जखमी गाय ब्राऊन रंगाची वय अदाजे 8 महीने शेपुट गोंडा काळा किमत अंदाजे 7000/ रु 12) एक जखमी गोरा पाढ-या रंगाचा वय अदाजे 7 महीने शेपुट गोंडा काळा किमत अंदाजे 6000 रु असे गोवंशीय जनावरे एकुण किंमत 1,21,000/-रु. व पिकअप क्र इन्टरा पिकअप क्र MH 38, X 3528 किमंत 5, 00, 000/- असा एकुण 6,21,000/-रु. चा मुददेमाल मिळुन आला.
आरोपी इन्टरा पिकअप क्र MH 38, X 3528 चा चालक व मालक यांचे विरुदध कलम 325,281 भारतिय न्यायसंहीता सहकलम 11 (1) (ड) (फ) प्राण्याना निर्दयतेने वागवणे कायदा सहकलम 5 (अ) (1), 5 (ब) 9 प्राणी संरक्षण कायदा 1976 सुधारित 2015, सहकलम कलम 118,119 महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम 130 (1) 177 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.