सामाजिक

कला व वाणिज्य महाविद्दालयाचे प्राचार्य अरुण हागे यांना आचार्य पदवी बहाल

Spread the love

हिवरखेड / प्रतिनिधी

हिवरखेड येथील सातपुडा विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड येथे कार्यरत असलेले प्रा. अरुण तुळशीराम हागे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. नारायणराव राणा महाविद्यालय बडनेरा येथील इतिहास विषयाच्या आचार्य पदवी संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड आचार्य पदवी संशोधन केंद्राचे मार्गदर्शक डॉ. नितीन सराफ इतिहास विभाग प्रमुख श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी यांच्या मार्गदर्शनात शोध प्रबंधाचे कार्य पूर्ण करून आचार्य पदवी संशोधन केंद्राद्वारे पीएच. डी. चा Viva-Voice घेण्यात आला. याकरिता बाह्य परीक्षक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख नामांकित इतिहासकार डॉ.संदेश वाघ यांनी मौखिक परीक्षा घेतल्यानंतर आचार्य पदवी संशोधन केंद्र तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला शिफारस केली त्यामुळे विद्यापीठाने आचार्य पदवीचे नोटिफिकेशन काढल्यामुळे आचार्य पदवी प्राप्त झाली. प्रा. अरुण हागे यांनी आपल्या यशाचे श्रेय सातपुडा विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेशराव ठाकरे, उपाध्यक्ष डाॅ राम काशिनाथ तिडके, सचिव कैलास काशिनाथजी तिडके तसेच आई वडील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी यांना देऊन सर्वाना धन्यवाद देत आहेत
हिवरखेड प्रेस क्लब कडुन त्यांचाआचार्य पदवी मिळाल्याबद्दल छोटेखानी कार्यक्रमात शाल श्रिफळ पुष्पगूच्छ देऊन सन्मान करन्यात आला

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close