सामाजिक

जुना धामणगाव डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुल येथे श्री गुरुदेव बाल संस्कार शिबिर आयोजित

Spread the love

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

दिनांक 1जुलै ते 10 जुलै2024 पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .आदर्श जीवन पद्धती व गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व संस्कार विद्यार्थ्यांना देणे काळाची गरज आहे .म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक ध्यानाने शिबिराची सुरुवात झाली .शिबिरामध्ये आदर्श दिनचर्या ग्रामगीता, श्लोक भागवत गीता ,आदर्श पुरुषाचे जीवन चरित्र ,संत महात्म्यांचे विचार व्यसनमुक्ती, स्त्री शिक्षण विद्यार्थी दिनचर्या ,साने गुरुजी ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,बाबा आमटे अशा विविध समाजसेवकांची माहिती सोबतच बौद्धिक तासिकेमधून विविध धर्माची माहिती धर्मग्रंथ धर्म उपासक या माध्यमातून सर्व धर्माचा समन्वय कसा करता येईल राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय राष्ट्रप्रेम म्हणजे काय राष्ट्रभक्ती म्हणजे काय अशा विविध गोष्टींचे ज्ञान या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जात आहे .आपल्या आई-वडिलांना नमस्कार करणे ,आजी आजोबांना नमस्कार करणे ,थोरांसोबत कसे राहावे ,कसे वागावे, कसे बोलावे इत्यादीचे ज्ञान या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जात आहे .सायंकाळी विद्यार्थ्यांना बौद्धिक खेळामधून त्यांचे बौद्धिक कौशल्य वाढ व्हावी यासाठी व सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विविध खेळाचे आयोजन केल्या जात आहे .संध्याकाळी सहा वाजता सर्व विद्यार्थ्यांचा सामुदायिक प्रार्थनाचा माध्यमातून विद्यार्थ्यांना धर्म पंथ जाती कशा निर्माण झाल्या मानवता ही जात महत्त्वाची आहे हे समजून दिल्या जात आहे. सामुदायिक प्रार्थना मध्ये सर्व धर्माचा समन्वय कसा आहे हे सुद्धा समजून सांगितल्या जात आहे .रात्रीला कथाकथन तासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवकांचे सैनिकाचे विविध आदर्श महापुरुषांचे जीवन चरित्र सांगितल्या जात आहे .रात्री राष्ट्र वंदना व निद्रा पूर्व प्रार्थना करून सर्व विद्यार्थी सहभागी होत आहे. या शिबिराला 19 जिल्ह्याचे 400 विद्यार्थी सहभागी झाले असून संस्काराचे धडे घेतल्या जात आहे .संस्थेचे सचिव माननीय शिवाजीराव पवार समन्वय प्रा.जया केने प्राचार्य मोहम्मद उज्जैन वाला ,उपप्राचार्य दीप्ती हांडे , प्राचार्य सुशांत देवबानी सर अधीक्षक हनुमंत ठाकरे ,हरिविजय युनाते ,अंकुश डुकरे ,महेश धांदे ,राहुल देशमुख ,रवी भगवे ,अजय सुलतानी ,शुभम मोरे मयूर बालपांडे ,अक्षय बोंद्रे, अमित सयाम ,हर्ष वासेकर ,प्रत्येक दिवेकर, श्रेयस लायस्कर अभिषेक डुकरे अभिजीत सातपुते हर्ष वासेकर ईश्वर भुरे इत्यादी शिक्षक शिबिरामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांमध्ये संस्काराचे बीजारोपण करत आहे.श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिराचे आयोजन डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुलामध्ये ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी या शिबिराचे आयोजन केले असून श्री गुरुदेव सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून चारशे विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे दिले जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close