सामाजिक

शेतकऱ्यां चा कांदा व दूधाच्या भाव वाढीसाठी मोठे आंदोलन उभारणार खा . डॉ . निलेश लंके

Spread the love

.

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला कांदा व दूध यांची भाववाढ होण्यासाठी मोठे आंदोलन उभे करणार असून त्यामुळे राज्यातील मंत्र्यांना राज्यात फिरता येणार नाही , त्यासाठी मला फक्त मंगळवार दि . २५ वा बुधवार दि . २६ ला दिल्लीत लोकसभेत खासदार की ची शपथ घेवू दया , असे प्रतिपादन नव निर्वाचीत खासदार डॉ .निलेश लंके यांनी केले आहे .
खा . डॉ . निलेश लंके यांचे निघोज बस स्थानक परिसरात आगमन होताच , फटाक्यांची आतिषबाजी , डी जे चा दणदणाट व तुतारी च्या निनादात भव्य स्वागत करण्यात आले . जोरदार मिरवणूकीने त्यांनी प्रथम श्री मळगंगा मातेचे दर्शन घेतले , तदनंतर निघोज मधील विविध आस्थपनां चे उद्घाटन केल्यानंतर कपिलेश्वर मंगल कार्यालयात निघोज ग्रामस्थ ,विविध संस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला , यावेळी त्यांनी सत्कारासाठी फुले , शाली ऐवजी शैक्षणिक साहित्य स्वीकारले , जेणेकरून गरीब , होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी दिले जाणार आहे . यावेळी विजयी सभा घेण्यात आली , ही सभा पाहण्यासाठी व खा . डॉ . निलेश लंके यांचा सन्मान करण्यासाठी अक्षरश : चढाओढ लागली होती , त्यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्ते क्षणा क्षणाची वाट पाहत होते . सभेच्या अध्यक्षस्थानी संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत हे होते . तर प्रास्ताविक करताना पारनेर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच ठकाराम लंके म्हणाले की , खा . डॉ . निलेश लंके यांना निघोज जिल्हा परिषद गटाने मोठे मताधिक्य दिले . त्यासाठी येथील जनतेचे मोठे योगदान आहे . झालेली ही निवडणूक धनाढ्या विरुद्ध गरीबाची होती , लंके यांनी विविध प्रश्ने मांडली .
यावेळी खा . डॉ . निलेश लंके पुढे म्हणाले की , मला खासदार की ची शपथ घेई पर्यंत काही बंधने आहेत . मी श्री मळगंगा मातेचा निस्सीम भक्त असल्याने माझे व निघोजकरां चे वेगळेच नाते आहे . त्यांनी मला गावातून व गणातून मोठे मताधिक्य दिले , त्यामुळे निघोज गाव व गणा चा माझ्या विजयात मोठा वाटा आहे . तसेच अळकुटी व त्या गणातील १३ गावां नी ही मला मोठे मताधिक्य दिल्या चा माझ्या सभांमध्ये मी आवर्जुन उल्लेख करतो . माझ्या आमदार कीच्या साडे चार वर्षाच्या कार्य काळात मी पारनेर – नगर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात विकास कामे करण्यासाठी निधी दिला . येथून पुढे ही कोणतीही विकासात्मक कामे सांगा , ती करून देण्याची जबाबदारी माझी व तुमची ही आहे , मी खासदार नाही , तर तुम्ही खासदार आहात . मतदार संघात माझ्या प्रचारासाठी तुम्ही सर्वांनी जीवाचे रान केले . हा लोकसभेचा मतदार संघ राज्यात सर्वांत मोठा असल्याने पारनेर तालुक्यात प्रचारासाठी मला फार च कमी व तोही अवघ्या २ दिवसांचा वेळ मिळाला , पण तुम्ही सर्वांनी निवडणूक हातात घेऊन प्रचंड मेहनत घेतली , त्यामुळे सर्वांत प्रथम तुम्हांला मानाचा मुजरा करतो , तुमच्या सर्वांच्या रांगून पाया पडलो, तरी उपकार फिटणार नाही . कार्यकर्ते माझ्या प्रचारा ला येताना घरच्या भाकरी भाजी बांधून आणत असे . जनतेनी ही निवडणूक हातात घेतली होती , अन् मला थेट दिल्ली ला पाठविले . पण मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तुमच्याकडे पुढील वेळेस येताना जिल्ह्यातील १२ आमदार घेवून येईन , असा शब्द देवून आलोय .
अशक्य ही शक्य करतील , ते श्री स्वामी समर्थ , तसेच जनतेनेही मला निवडून दिल्याने अशक्य ही ते शक्य करून दाखविले . माझा राजकीय प्रवास सोपा ही नाही आणि माझ्या राजकीय कारकिर्दीत मी १४ वर्षा पुर्वी हंगा सारख्या छोट्या गावचा सरपंच होतो , १० वर्षांनी थेट आमदार झालो , तदनंतर आज खासदार झालो , मी अपराजित योध्दा आहे . माझा अजूनही विश्वास बसत नाही , की मी खासदार झालो , पण राज्यातील सर्वच मतदासंघात माझे विजयी फलक लागले आहेत . एवढे प्रेम जनता माझ्यावर करते , हे कोणाच्याही नशिबात नसते . मी विजयी झाल्यावर तरुणांपेक्षा म्हाताऱ्या लोकांनी डि जे पुढे नाचून आनंद साजरा केला . लोकां नी मला एवढा दुवा दिला आहे की, माझ्यासाठी नवस केले , त्यांचे उपकार ५ वर्षात काय , या जन्मात ही फिटणार नाही . आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर ची जागा एक लाख मताधिक्याने जिंकू . लोकं मला भेटायला येतात , विकास कामे मागतात , पण थोडे थांबा , मला खासदार की ची शपथ घेवू दया , माहिती होऊ दया , अभ्यास करू द्या , राज्य सरकार सारखाच ,पण त्यापेक्षा जास्त निधी केंद्र सरकारचा आणतो , की नाही , ते बघाच . कोणी ही आईच्या पोटात शिकत नाही , तसा मला थोडा अवधी दया , असे ही सरते शेवटी खा . डॉ . लंके म्हणाले .
यावेळी अशोक सावंत , पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार , खंडू भुकन , माजी सदस्य डॉ भास्करराव शिरोळे , ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद , पांडुरंग कृपा पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत लंके , युवा नेते रुपेश ढवण , शिवसेना नेते बाबाजी तनपुरे , माजी सरपंच शिवाजी औटी , स्वाती न -हे , राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे , उपसभापती बापू शिर्के यांनी मनोगत व्यक्त केले , तर व्हाईस चेअरमन नामदेव थोरात , प्रसिद्ध उद्योजक अमृता रसाळ , माजी चेअरमन रामदास वरखडे , शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे , मळगंगा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विठ्ठलराव कवाद , माजी सरपंच संतोष काटे , युवा नेते अनिलराव आवारी , विश्वस्त बाळासाहेब लंके , विश्वास शेटे , विकास शेटे , सरपंच दत्ता म्हस्के ,सदस्य शंकरराव गुंड , पप्पू मते , दिलीप ढवण , सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर , कविता लंके , पुष्पा वराळ व इतर मान्यवर उपस्थित होते . रात्री उशिरा सुरू झालेली सभेला प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने रात्री उशिरा १२ वाजता विजयी सभा संपली , तदनंतर जेवणाचा कार्यक्रम संपन्न होवून सभा संपली . तरी देखील तरुण , वयस्कर कार्यकर्ते खा . डॉ लंके यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दीत रेटा रेटी करत होते . निवेदने देत , फोटो काढत होते , लंके ही सर्वांना हसत हसत सामोरे जात होते . पारनेर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी उत्तर रित्या सुत्र संचालन केल्याने सभा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाली .

– खा . डॉ . निलेश लंके सभा स्थळी प्रचंड घोषणा च्या गजरात दाखल झाले व बसल्या जागेवरून कार्यकर्त्यांना खुणावत सभा स्थानकावर बोलवत , चौकशी करत , प्रत्येकाबरोबर फोटो काढत होते , त्यामुळे कार्यकर्ते सुखावत होते .भाषणात प्रत्येक गावच्या कार्यकर्त्या चे नामोल्लेख करत , कोणी किती व कसे काम करत याचा आर्वजून उल्लेख करत असल्याने उपस्थित जनसमुदाय टाळ्यांचा गजर करत होते , त्यातून खा . डॉ . लंके यांची दूरदृष्टी दिसून येते .]

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close