सामाजिक

त्या’ निष्पाप यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करा : तेल्हारा विहिंप – बजरंग दलाचे निवेदन

Spread the love

तेल्हारा दि.१३ (ता.प्र) धार्मिक यात्रेकरिता निघालेल्या हिंदू भाविक भक्तांच्या बसवर माता वैष्णोदेवी कटरा व शिवखोडी येथे दर्शनाला जात असतांना रविवारी ९ जून रोजी इसमासिक जिहादी व पाकीस्थान पोषील आतंगवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून १० भाविकांची हत्या केल्याच्या निषेधार्थ तेल्हारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने तेल्हारा तहसिलदारांना गुरुवार दि. १३ जून रोजी निवेदन देण्यात आले.जिहादी अतिरेक्यांवर कठोर कारवाई व फाशीची शिक्षा व्हावी.अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रपती महोदयांपर्यंत सदर निवेदन पोहचविण्यात यावे. अशी विनंती शेवटी निवेदनातून करण्यात आली आहे.

तेल्हारा बजरंग दल संयोजक निलेश खेट्टे यांच्या नेतृत्वात तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर विहिंपचे अकोला ग्रामीण उपाध्यक्ष राहुल श्रृंगारकर बजरंग दल तेल्हारा सहसंयोजक विशाल गावत्रे,शहर सहमंत्री शुभम ढेंगे,मंत्री,गोपाल वाघ, विधी प्रमुख अॅड.सागर शर्मा, ऋतीक मानकर,गजानन मुंजे, सुरेश शिंगणारे,संजय गव्हाळे, मनिष गोयनका,प्रविण उजाड, शेखर देशमुख,विनोद रुद्रकार, मिठाणा बरडे,ऋषभ ठाकुर,दुर्गा वाहिनीच्या सौ.मयुरी देशमुख, वंदना देशमुख,ज्योती धनभर, भारती देशमुख,विद्या बोडखे, सविता देशमुख,माया ठोकणे युतकार यांच्यासह विहिंप,बजरंग एक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close