विदेश

दत्तक घेतलेल्या मुलासोबतच सुरू होते राजकीय महिलेचे संबंध 

Spread the love

                    जगात घडणाऱ्या अनेक घटना अश्या असतात ज्यावर विश्वास करावा अथवा नाही असा प्रश्न स्वतःलाच पडतो. सावत्र आई कडून मुलाचे लैंगिक शोषण , सावत्र बापाकडून मुलीचे लैंगिक शोषण हा प्रकार काही वेळा पाहायला मिळतो. थायलँड मधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे  प्रसिद्ध महिला राजकीय नेत्या प्रापापोर्न चोइवाडकोह याना त्यांचे पती टी यांनी आपल्या दत्तक घेतल्या 24 वर्षीय मुलासोबत आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. दोघांचा हा दत्तक घेतलेला मुलगा मॉंक म्हणजे एक भीक्षु आहे. प्रापापोर्नच्या पतीने दोघांचा एक व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केलाय.

हा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय नेत्या प्रापापोर्न याना पब्लिक ऑफिसमधून निलंबित करण्यात आलं आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चोइवाडकोह आणि तिचे पती टी गेल्यावर्षी एका मंदिरातून भिक्षु फ्रा महा याला दत्तक घेतलं होतं.

डेलीच्या वृत्तानुसार, टी याना आधीच पत्नी आणि दत्तक मुलाच्या संबंधावर संशय होता. घटनेच्या दिवशी जेव्हा पत्नी प्रापापोर्नने त्यांचा फोन उचलला नाही त्यांना संशय आला आणि ते घरी पोहोचले. इथे त्यांना जे दिसलं ते बघून त्यांना धक्का बसला. त्यांना दिसलं की, पत्नी आणि मुलगा आपेक्षार्ह स्थितीत आहेत.

टी यानी डेली मेलला सांगितलं की, जेव्हा मी त्यांना सोबत पाहिलं तेव्हा मला खूप राग आला. माझा फार मोठा विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. मी तिच्यासाठी सोन्यापासून ते अनेक महागडे गिफ्ट आणत होतो.

त्यानी सांगितलं की, ‘मी पत्नीला आधी मुलाच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं. तेव्हा तिकडे सगळीकडे पडदे लावले होते. मी बराचवेळ दरवाजा वाजवला. पण कुणीच उघडला नाही. मग मी दुसरीकडून आत शिरलो. तेव्हा ती म्हणाली की, ती त्याच्यासोबत प्रार्थना करत होती. मला वाटतं मुलाने माझ्या पत्नीला फसवलं आणि तिला चुकीच्या मार्गाने नेलं. आता तो पळून गेला आहे’.

जेव्हा टी ने दोघांना बेडवर आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं तेव्हा त्यानी त्यांचा व्हिडीओ बनवणं सुरू केला. त्यानी बेडशीट खेचत म्हटलं की, आता तर तुम्ही खूश आहात ना? आता व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रापापोर्नचं उत्तर आलं आहे. ती म्हणाली की, आमच्यात असं काही झालेलं नव्हतं जसं की, दाखवलं जात आहे. मुलगा चिंतेत होतात म्हणून आम्ही केवळ बोलत होतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close