हटके

मुंबईत १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी चालवत होती सेक्स रॅकेट

Spread the love

छाप्यात दीड लाखांच्या बनावट नोटा ही सापडल्या

चार तरुणींची सुटका ; जबरदस्तीने व्यवसायात ढकलल्याचे उघड

मुंबई/ नवप्रहार मीडिया

                       देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतून ऐक धक्कादायक घटना उघड झाली आहे. वाशी येथील एका हॉटेल मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेट वर ह्युमन ट्रफिकींग सेल ने छापा टाकून चार तरुणीची सुटका करण्यात आली आहे.विशेष म्हणजे हे रॅकेट एक १७ वर्षाची मुलगी चालवत असल्याचे तपासात आढलून आले आहे. या छाप्यात पोलिसांना दीड लाखांच्या नकली नोटा देखील सापडल्या आहेत.

                      पोलिसांना वाशी येथील एका हॉटेल मध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती  मिळाल्या वर पोलिसांनी ह्युमन ट्रॉफीकिंग सेल लां याबदल माहिती देवून रेड टाकण्याचा प्लॅन आखला. यासाठी सुरवातीला बनावट ग्राहक पाठवून बोलणी करण्यात आली.त्याच्या कडून सिग्नल मिळताच चमूने हॉटेल मध्ये रेड टाकून चार तरुणींना ताब्यात घेतले.

१७ वर्षाची तरुणी चालवत होती सेक्स रॅकेट – पोलिसांच्या तपासात सदरचे सेक्स रॅकेट १७ वर्षाची अल्पवयीन तरुणी चालवत होती असे उघड झाले आहे. ती मालाड येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

तरुणींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात आणले होते – पोलिसांनी ज्या चार तरुणींना या रेड दरम्यान पकडले त्या चार तरुणींना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांचे वय  २० वर्षे असून यातील ऐक नेपाळ तर अन्य बिहार येथील आहेत.

सेक्स रॅकेट चालविणारी तरुणी या तरुणींना देत होती अल्प रक्कम – ताब्यात घेतलेल्या मुलींनी सागितले की सेक्स रॅकेट चालविणारी तरुणी ग्राहकां पासून मोठी रक्कम घेऊन त्यांना अल्प रक्कम देत होती. तिने अल्पावधीत मोठी संपत्ती जमविल्याची माहिती देखील ताब्यात असलेल्या तरुणींनी पोलिसांना दिली आहे. ताब्यात असलेल्या तरुणींना पोलिसांनी पुनर्वसन केंद्रात पाठवले असून तेथे त्यांचे ब्रेनवॉश केल्या जात आहे.

छाप्यात दीड लाखांच्या बनावट नोटा सापडल्या ,-पोलिसांनी घटनास्थळी एक मोबाईल फोन, महागडं घड्याळ आणि रक्कम जप्त केली. इतकंच नाही तर दीड लाख रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मानवी तस्करीच्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close