शाशकीय

अचलपुरात २२ तलाठ्यांचे असहकार आंदोलन

Spread the love

 

विदर्भ पटवारी संघाचे एक दिवसीयधरणे आंदोलन धरणे

अचलपुर प्रतिनिधी -: किशोर

– ग्रामिण भागातील प्रशासन व नागरिकांचा दुवा असणार्‍या तलाठ्यांनी आपल्या अनेक प्रलंबीत मागण्यांसाठी एक दिवसीय असहकार आंदोलनपुकारात शासनाकडे आपल्या विविध मागण्या कडे लक्ष वेधण्याकरिता आज अचलपूर तहसील कार्यालयात परिसरात तालुक्यातील २२ तलाठ्यांनी असहकार आंदोलन करत एक दिवसीय धरणे आंदोलन केले .
गुरुवार रोजी अचलपूर येथे विदर्भ पटवारी संघ नागपूर २च्या वतीने तलाठ्यांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता साठी आज तहसील कार्यालय अचलपूर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करत तलाठ्यांनी असहकारआंदोलन केले . सातबारा ,आठअ , नापिकीचा सर्वे अतिवृष्टी अवैध वाळू तस्करी तसेच महसूल संदर्भात अनेक समस्या अनेकविषय विषय तलाठी हाताळत असतात परंतु शासनामार्फत त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही .तलाठ्यांना बसायला हक्काचे कार्यालय , कामाकरता दिलेले लॅपटॉप प्रिंटर हे कालबाह्य झालेले आहेत ,रखडलेल्या पदोन्नती ,महिला तलाठ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे , असे अनेक प्रश्न अनेक मागण्या प्रलंबित असून देखील ते आपले कर्तव्य बजावत असतात परंतु वेळोवेळी निवेदन देऊन देखील समस्या सोडत नसल्यामुळे विदर्भ पटवारी संघ नागपूर २ च्या वतीने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज अचलपूर तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन केले .
यावेळी तलाठी निशांत शास्त्रकार , अमित गाढफे ,आर बी भास्कर , संतोष गेठे , शाम फाटकर ,दिलीप हरणे ,सुनील साखरे ,, रवींद्र वाठ , निखिल बेलोकर ,कु . पूजा इंगळे ,कु .शुभांगी कपले , कु .रूपाली गावंडे , चैताली तळमकर ,अनिल पोटे , हेमेश्वरी भैसारे , डीएम बासुंदे , अमोल बोकडे गौरव लहाडके , आदी तलाठी उपस्थीत होते .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close