सामाजिक

तिक्ष्णगत ” च्या भव्य गरबा कार्यशाळेचे थाटात उदघाटन ..!

Spread the love

 

प्रतिनिधी ( मूर्तिजापूर) तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेयर सोसायटी* मुर्तिजापूर माध्यमातून वर्षभर कधी किल्ले बांधणी कार्यशाळा, रोजगार मेळावा,गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, विविध गावांमध्ये रोजगार उद्योग व मार्गदर्शन मेळावे,काव्य मैफली,गीत गायन,मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप,असे कित्येक तरी सामाजिक उपक्रम होत असतात ,नवरात्री पुर्व उत्सवाच्या निमित्ताने दहा दिवसीय भव्य गरबा कार्यशाळा भक्तीधाम मंदिर मुर्तिजापूर येथे घेण्यात येत असून, या निःशुल्क भव्य गरबा कार्यशाळेसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.यामध्ये महिला, युवती व पुरुष सहभागी होत आहेत,ही कार्यशाळा खुल्या प्रवर्गात असून यामध्ये महिला,पुरुष सहभागी होवू शकतात. ह्या निशुल्क प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे तिक्ष्णगत शाखा मुर्तिजापूर च्या वतीने करण्यात आले आहे . याचे उत्साहपुर्वक कार्यशाळेचे उद्घाटन *उद्योग रत्न मा. डॉ सुगतजी वाघमारे साहेब* यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

*ही कार्यशाळा भक्तीधाम संस्थान च्या सभागृहात दि. ०५ ऑक्टो. ते १४ ऑक्टोबर पर्यंत दु . ३ ते ५ वा . राहणार आहे.*
या उद्घाटकीय कार्यक्रमाचे अध्यक्ष , *तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी चे संचालक मा. डॉ. सुगतजी वाघमारे साहेब* हे होते तसेच तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी संस्थेचे सचिव *मा. विष्णुदासजी मोंडोंकार सर* हे होते , प्रमुख अतिथी म्हणून *डॉ. नंदुजी खंडारे , कल्पना ताई तेलंग , साहित्यिका मंदाताई खंडारे , चंदाताई श्रृंगारे , संजय भारंबे , राजु चौरपगार, विशाल शिंदे* यांची उपस्थिती होती. प्रशिक्षक शंतनू ढोले सर यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

या निःशुल्क भव्य गरबा कार्यशाळेसाठी कोणाला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी कार्यक्रमाच्या समन्वयीका जया भारती , मिलिंद इंगळे आणि या कार्यशाळेचे प्रशिक्षक शंतनु सर यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या उद्घाटन सोहळ्याचे संचालन मिलिंद इंगळे यांनी केले तर
आभार अनिल डाहेलकर यांनी मानले.

या उदघाटनीय सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मिलिंद इंगळे , उमेश शिरसाट , अनिल डाहेलकर , श्वेता शिरसाट , मनिषा तायडे ,हर्षदा डोंगरे, बाळुकाका गवई , प्रयत्नरत होते .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close