दहा लाभार्थ्यांना मोफत ई राशन कार्डचे वाटप
विभागातून पुसदच्या तहसील कार्यालयाला मिळाला पहिला मान
राजेश सोनुने तालुका प्रतिनिधी । पुसद
येथील महसूल विभागाच्यावतीने महसूल दिन सप्ताह आयोजित करण्यात आला होता.त्या निमित्ताने दि.२ऑगस्ट २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकियन एस.यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार महादेव जोरवर यांच्या हस्ते दहा लाभार्थ्यांना मोफत ई कार्डचे वाटप करण्यात आले.
अमरावती विभागातून सर्वप्रथम पुसद तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभागामार्फत मोफत ई रेशन कार्ड वाटप करण्याचा मान मिळाला आहे.सदर ई रेशन कार्ड निःशुल्क मिळत आहे.अर्ज केल्यावर ई रेशन कार्ड लाभधारकांना घर बसल्या मोबाईलवर मिळणार आहे.येथील कार्यालयामार्फत धरमवाडी येथे राहणारे दगडू ठोकले,नागु बेले,कृष्णानगर येथे राहणारे दिलीप कराडे,सुभाष बुरसे,पिंपळगाव येथील अनिता राठोड,भोजला येथील सै. हनीफ सै. मुसा,बोरी मच्छिंद्र येथील ललिता कांबळे,माणिकडोह येथील विकास ढोले,पुसद येथील असलम खान,जवाहर नगर येथील पूर्णा राठोड या दहा लाभार्थ्यांना वाटप ई रेशन कार्डचे वाटप करण्यात आले आहे.त्यामुळे जास्तीत जास्त लाभधारकांनी ई रेशन कार्डचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्फत केल्या जात आहे.येथील महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार जी. कदम,निरीक्षण अधिकारी व्यंकटेश रावलोड, पुरवठा निरीक्षक अतिभ उल हक्क,कार्ड लिपिक छाया जामकर उपस्थित होत्या.