हटके

शिकवणी साठी येणाऱ्या मुलींचा धर्मातरणाचा प्रयत्न 

Spread the love

हिना शेख हिने चालविला होता हा गैरप्रकार

मुस्लिम तरुणांशी ओळखी वाढवण्याचा हिना मुलींना देत होती सल्ला 

गावात तणाव परिस्थिती नियंत्रणाखाली 

राहुरी / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                  शिकवणी साठी येणाऱ्या मुलींच्या धर्मांतरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक आणि खेदजनक बाब उघड झाली आहे. मुलींच्या तक्रारीवरून संबंधित 8 लोकांवर गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 5 लोकांना  ताब्यात घेण्यात आले आहे. शिकवणी घेणारी हिना शेख ही तिच्याकडे ज्ञानार्जन करण्यासाठी आलेल्या मुलींना मुस्लिम युवकांशी ओळखी वाढवण्याचा सल्ला देत असल्याचे देखील समजते. 

या घटनेनंतर गावात दोन गटांत तणाव निर्माण झाला आहे. फुस लावणार्‍या आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या घटनेनंतर गेल्या 4 दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उंबरे तालुका राहुरी येथील धर्मांतर करण्याचा प्रयत्नासार’या गंभीर घटनेचा विषय शुक’वारी विधान परिषदेत चर्चेला आल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सभापती नीलम गोर्‍हे यांनी दिले आहेत. राहुरी तालुक्यातील उंबरे गावात मुस्लिम समाजातील हिना शेख हिने 3 वर्षांपासून गावात खासगी शिकवणी वर्ग सुरू केले होते. या क्लाससाठी येणार्‍या सातवी-आठवी वर्गातील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्याचा तसेच मुस्लिम तरुणांशी ओळख वाढवण्याचा सल्ला शिक्षिका हिना शेख देत होती. 26 जुलै रोजी पहिल्यांदा हा प्रकार समोर आला. त्यानंतर गावात दोन गटांत हाणामारी होऊन दंगलसदृश परिस्थिती झाली होती.

पोलिसांनी गांभीर्य ओळखून ग’ामस्थांना शांततेचे आवाहन केले. यामुळे तणावाचे वातावरण निवळण्यास मदत झाली. त्यानंतर पहिल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून या घटनेतील आरोपी आवेज निसार शेख व कैफ जिलानी शेख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. कैफ शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आवेज शेख हा नगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. या घटनेतील उंबरेतील शिक्षिका हिना मुश्ताक शेख हिला शुक’वारी रात्री, तर सलीम शेख या आरोपीस शनिवारी दुपारी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा तपास अप्पर पोलिस अधीक्षिका स्वाती भोर, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे, उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहेत. अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या व मदत करणार्‍या आठ आरोपींपैकी अल्ताफ शेख, कैफ शेख, शाकीर शेख, हिना शेख व सलीम शेख या पाच जणांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. एक जण नगर येथे उपचार घेत आहे. तर एक जण अद्याप फरार असून एक अल्पवयीन मुलाचाही आरोपीत समावेश आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close