हटके

अन.. शाळकरी मुलाने भरले मुलीच्या भांगात कुंकू ; टिन एज लव्हस्टोरी 

Spread the love

            सध्या मोबाईल च्या अती वापरामुळे मुले लहान वयातच समजदार होत आहेत.इंटरनेट वर सहज उपलब्ध होणाऱ्या अश्लील साहित्यामुळे ते लवकर वयात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात जे काही दिसत आहे ते पालकांची चिंता वाढवणारी आहे.।तुम्ही देखील ही बातमी वाचून “जग कुठं चाललंय ” हे म्हटल्या शिवाय राहणार नाही.

असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर शालेय मुला-मुलींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगा मुलीच्या भांगात कुंकू भरताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी तर याला लो बजेट मॅरेज म्हटलं आहे.

शालेय विद्यार्थ्यांवर प्रेमाचा रंग चढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये शालेय मुलगी आणि मुलगा एकमेकांवरील त्यांचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तीन शालेय मुली दिसत आहेत. यातील एका मुलीच्या भांगात एक मुलगा कुंकू भरताना दिसत आहे. या घटनेदरम्यान, कुणीतरी लपूनछपून बाल्कनीतून या दृष्याचं मोबाईल फोनमध्ये चित्रिकरण केल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येत आहे.

एक मुलगा मैत्रिणींसोबत शाळेतून घरी परतणाऱ्या गर्लफ्रेंडचा सिंदूरने भांग भरतो. मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत शाळेतून परतत असताना मुलीचा प्रियकर तिथे येतो आणि मुलीच्या भांगात कुंकू लावतो. व्हायरल व्हिडीओमध्ये 16 ते 17 वर्ष वयाचे शालेय मुलं-मुली दिसत आहेत. या शालेय विद्यार्थ्यांना प्रेमाचं भलतंच वेड लागलं होतं. या प्रेमासाठी त्या दोघांनी थोडक्यात लग्न उरकलं. यावेळी दोन इतर मुलीदेखील तिथे उपस्थित होत्या.

भररस्त्यात बॉयफ्रेंडने शालेय गर्लफ्रेंडच्या भांगात कुंकू भरून सात जन्माचं वचन घेत लग्न केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी यावर कमी बजेटमधील लग्न अशा कमेंट करत आहेत. नेटकऱ्यांना यावर भन्नाट कमेंट केल्या आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, जर लग्न अशा पद्धतीने झालं, तर प्रत्येक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड त्यांची इच्छा असेल तेव्हा पती-पत्नी बनतील. व्हिडीओमध्ये मुलगाकडे लाल रंग दिसत आहे आणि नंतर मुलीच्या संमतीने तो तिच्या भांगात कुंकू भरतो. बॉयफ्रेंडने भागांत सिंदूर भरल्यानंतर मुलीनेही मुलाला रंग लावला आणि मग त्याला मिठी मारली. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close