हटके

३८ वर्षीय महिला युट्युबर ला ५ वर्षाच्या मुलासोबत व्हिडीओ बनवणे पडले महागात

Spread the love

महिलेकडून मुलाच्या प्रायव्हेट पार्टला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा होत आहे आरोप

मुबई –  ३८ वर्षीय युट्युबर महिलेला ५ वर्षाच्या मुलासोबत व्हिडीओ बनवणे चांगलेच महागात पडले आहे. या व्हिडिओत महिलेने या मुलाच्या प्रायव्हेट पार्टला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याने तिने त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होत आहे. कोर्टाने देखील महिलेला फटकारले आहे.

या मुलाला महिलेच्या मैत्रिणीने दत्तक घेतलेला आहे. पॉक्सो कायद्यातंर्गत महिलेचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. या प्रकरणी मुलाला दत्तक घेणारी आईदेखील आरोपी आहे. ती सध्या जेलमध्ये आहे.

पॉक्सो कोर्टाच्या न्यायाधीशांनी स्वत: हा व्हिडिओ पाहून महिलेला फटकारले. महिलेने कोर्टात सांगितले की, मी मुलाला खेळवण्याच्या उद्देशाने मांडीवर घेतले होते. परंतु कोर्टाने व्हिडिओत स्पष्ट दिसतंय, मुलगा महिलेच्या मांडीवर किती असहाय्य दिसतोय. मुलाच्या हावभावावरून ते दिसून येते. मुलगा महिलेच्या मांडीवरून उतरल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला त्याला त्रास होत असल्याचे दिसते. या महिलेचा हेतू चांगला नव्हता. लैंगिकतेचे विचार तिच्या मनात होते. यासाठी मुलाचे कपडे काढायलाच हवे असे नाही. महिलेने मुलासोबतचा हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोडही केला.

बहिणीने केली तक्रार 
हे प्रकरण पोलीस आणि कोर्टासमोर मुलाच्या बहिणीने तक्रार केल्यानंतर आले. मुलाची बहीण डॉक्टर असून ती दत्तक घेतलेल्या जोडप्याची मुलगी आहे. मुलाला दत्तक घेण्याची प्रक्रियाही बेकायदेशीर आहे. त्यात कुठलेही कागदपत्रे नाहीत. एका भिकाऱ्याकडून मुलगा दत्तक घेतला होता. दोन्ही महिला मुलाचे लैंगिक शोषण करायच्या. ही यूट्यूबर महिला अन्य मुलांचेही लैंगिक शोषण करते असा आरोप बहिणीने केला.

तक्रारदार महिलेने विरोध केला तरीही आरोपी महिलेला तिच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप झाला नसल्याचेही न्यायालयाने निरीक्षण केले. व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली आरोपी महिलेकडून सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. व्हिडिओ बनवताना महिलेचा हेतू योग्य नव्हता. या आठवड्यात आरोपी महिलेविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?
आरोप आहे की, ३१ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी महिलेने मुलाचा एक तासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. याच व्हिडिओच्या एका क्लिपमध्ये हे गाणे वाजत असून त्या महिलेने मुलाला उचलून घेतले आणि तिचे हात मुलाच्या प्रायव्हेट पार्टवर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलेच्या कुशीत मूल खूप अस्वस्थ होते, वेदनेमुळे तो रडत होता, त्याला मांडीवरून उतरायचे होते असा आरोप करण्यात आला. या महिलेने इतरही अनेक व्हिडिओ बनवले होते. अशाच एका व्हिडिओमध्ये ती अश्लील भाषा वापरताना दिसत आहे. मला असे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असेही आरोपी महिलेने म्हटले आहे. न्यायाधीश म्हणाले की, माझ्यादृष्टीने व्हिडिओ बनवण्याच्या नावाखाली मुलाला अशा प्रकारे उचलणे, त्याचा प्रायव्हेट पार्ट अशा प्रकारे दाबणे आणि या कृत्याची लाज वाटू नये, तसेच अश्लील आणि गलिच्छ भाषा वापरत आहे. याशिवाय एक महिला असूनही कुठलीही पर्वा न करणे हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही असं त्यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close