काय म्हणालात …….? ती स्वतःची थुंकी विकून ती कमावते महिन्याकाठी 41 लक्ष रुपये
नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क
जगाच्या पाठीवर असे लोकं आहेत जे विचित्र गोष्टींमुळे चर्चेत येतात. ते जे काही करतात त्यात विचित्रता आणि वेगळेपणा असतो. त्यातील काही प्रकार किळसवाणे देखील असतात. आता आम्ही तुम्हाला ज्या विचित्र प्रकाराबद्दल सांगणार आहोत ते ऐकून तुम्हालाही सुरवातीला स्वतःच्या कानावर विश्वास बसणार नाही. पण गोष्ट एकदम सत्य आहे.
ज्या गोष्टीसाठी आपल्या देशात मनाई आहे आणि ते करतांना आढळल्यास दंड आकारला जाईल अश्या सूचना जागोजागी असतात.( दंड आकारात नाही तो भाग वेगळा) याच गोष्टींच्या माध्यमातुन ती तरुणी महिन्याला 41 लक्ष कमावते. आश्चर्याची बाब म्हणजे अशा विचित्र आणि किळसवाण्या गोष्टी करण्यासाठी त्यांना पैसैही मिळतात. ज्यामुळे ते लाखोंपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत पैसे कमावतात. नुकतीच यामध्ये आणखी एक घटना समेर आलीये जी चर्चेचा विषय ठरत आहे. एक मुलगी तिची लाळ एका बाटलीत विकत असून यातून ती दर महिन्याला 41 लाखांहून अधिक कमावते.
या कमाईमुळे तिचे आयु्ष्य बदलून गेले. ही घटना सध्या चर्चेत आली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. आपली थुंकी लाळ बाटलीत भरुन विकणाऱ्या तरुणीचं नाव लतिशा जोन्स आहे. तिला पहिल्यापासूनच डॉक्टर व्हायचं होतं. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने विद्यापीठात बायोमेडिकल सायन्सचा अभ्यास सुरू केला. फी भरण्यासाठी तिने अर्धवेळ नोकरीही सुरू केली. पण नंतर तिनं शिक्षण सोडून हे काम सुरु केलं.
लतिशाने या पैशातून तिचे सर्व कर्ज फेडलं आहे. तिने एक फ्लॅटही घेतला आहे. सध्या ती फक्त 22 वर्षांची आहे. त्यांना कळले की लोक कापलेली नखे, थुंकणे आणि एक आठवडा जुने कपडे विकत घेतात. जुन्या चादरीच्या बदल्यात 300 पौंड म्हणजे 31 हजार ते 1500 पौंड म्हणजे 1.54 लाख रुपये देण्यास तयार आहेत. हीच संधी लतिशाने साधली आणि शिक्षण सोडून ती या व्यवसायाकडे वळाली. लतिशा सांगितलं की लोक खूप विचित्र गोष्टींची मागणी करतात. लोकांनी मला माझी जुनी चादर मागितली.
घामाने भरलेले जीमचे कपडे, टूशब्रश आणि थुंकलेली टुथपेस्ट. ती म्हणाली माझ्या आजूबाजूचे लोक मला खूप सपोर्ट करतात. तर काही माझ्यावर हसतात. पण मी असं काही करिअर करेल असं कधी वाटलं नव्हतं. मी महिन्याला 41 लाखांपर्यंत कमावते. दरम्यान, यापूर्वीही अनेक विचित्र गोष्टी करणाऱ्या लोकांच्या घटना समोर आल्या होत्या. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.