क्राइम

सासऱ्याने जावयाला पत्नी सोबत पाहिले नको त्या अवस्थेत अन …….

Spread the love

बिलासपूर / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                 वर्तमान काळात लोकांची मानसिकता शेण खायला जाते की काय ? असे समाजात घडणाऱ्या विचित्र घटनांवरून समोर येत आहे. कधी मुलगा मुलगी पाहायला जातो तर त्याला मुली ऐवजी मुलीची आई पसंत पडते आणि मग तो होणाऱ्या सासू सोबत लग्न करतो. तर कधी लग्न झाल्यावर जावयाचा सासुवर जीव जडतो आणि तो बायकोला सोडून सासू सोबत पळून जातो. जातो तर कधी जावयाचे सासू सोबत लफडे असते आणि तो बायकोला सोडून सासरी सासूला भेटण्यासाठी आणि तिच्या सोबत नको ते करण्यासाठी येतो. असचं सासू सोबत लफडं असलेलं जावई सासूला भेटायला आला.आणि अचानक आलेल्या सासऱ्याने जावयाला बायको सोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याने सासऱ्याने दोघांवर कुऱ्हाडीने हमला केला. त्यात त्याची बायकोअरं पावली तर जावई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.”

याबाबत अधिक माहिती अशी की, चंदन मेश्राम (४८) असे आरोपीचे नाव असून तो जुनापारा चौकी भागातील सालेदबारी-बग्गुडवा पारा येथील रहिवासी आहे. तो शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. त्याच्या घरात पत्नी अमरीकीबाई आणि तीन मुली तसेच दोन मुले आहेत. त्यांची मुलगी ललिता हिचे जुनापार येथे लग्न संजू नावाच्या तरुणाशी लग्न झाले होते.

मात्र लग्नानंतर संजू आणि त्याची सासू अमरिकीबाई यांचे संबंध जुळल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी दुपारी चंदन अचानक त्याच्या शेतात पोहोचला असता त्याने पत्नीला जावई संजूसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले .यामुळेच संतापाच्या भरात त्याने जवळच ठेवलेली कुऱ्हाड उचलून दोघांवर हल्ला केला. या घटनेत त्याची पत्नी जागीच ठार झाली, तर संजू गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तर जखमी संजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close