क्राइम
अनेक दिवसांपासून राहत होते एकत्र
वी शिंदे, प्रतिनिधीभिवंडी, 1 मे : भिवंडी शहरातील लाहोटी कंपाउंड या कपडा मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या शुल्लक वादातून डोक्यात लादीचा प्रहार करून एका तृतीयपंथीय युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
भिवंडी / नवप्रहार न्यूज नेटवर्क
मागील अनेक दिवसांपासून सोबत राहणाऱ्या तृतीयपंथी मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तौसिफ़ मनीन बागवान उर्फ बेब्बो असे हत्या झालेल्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तर हत्या करणारा आरोपी मोहम्मद कामील जमील अन्सारी यास शहर पोलिसांनी अटक केली आहे.
तौसिफ़ मनीन बागवान उर्फ बेब्बो (रा. नविबास्ती) हा तृतीयपंथीय मागील कित्येक दिवसांपासून आपला मित्र मोहम्मद कामील जमील अन्सारी या सोबत लाहोटी कंपाउंड या ठिकाणी अनैसर्गिक संबंध ठेऊन राहत होता.
काल रात्री त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने मोहम्मद कामील जमील अन्सारी याने त्याठिकाणी पडलेली वजनदार लादी उचलून तौसिफ़ मनीन बागवान उर्फ बेब्बो याच्या डोक्यात घातली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर असंख्य तृतीयपंथीय शहर पोलीस ठाण्याबाहेर एकत्रित येत त्यांनी आरोपीस अटक करण्याची मागणी लावून धरली.
शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी तात्काळ पोलिस पथकास आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी मोहम्मद कामील जमील अन्सारी यास परिसरातून ताब्यात घेत त्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |