संस्कार शिबिराने मिळाले ग्रामीण भागाला वरदान
भंडारा / जील्हा प्रतिनिधी
*प्रवित्र मन रखो, प्रवित्र तन रखो* *प्रवित्रता मनुष्यताकी शान हैरान*, *जो मन वचन कर्म से प्रवित्र है*, *वो चारित्रवान ही यहा महान है*….
शब्दांइतकेच पवित्र स्वर वातावरणात गुंजतात आणि तालबध्द येणा-या प्रत्येक घडामोडी गणिक कोवळ्या मनावर आवश्यक संस्कार होत असतात. संस्कार शिबिराची सुरुवात १९९० च्या उन्हाळ्यापासून झाली. शहरात सुरु झालेले हे शिबिर आता ग्रामीण भागातही चांगले मुळ धरु लागले आहे. प्रा. वामनराव तुरिले यांनी ज. मु. पटेल महाविद्यालयात लावलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत झोपडपट्टीतील मुलांमुलीं -करिता एक बालक वाचक प्रकल्प राबविला. यात यश मिळाल्यावर ७ ते १६ वर्षाच्या मुला-मुलींसाठी वक्तृत्व, लेखन इत्यादींचे धडे दर रविवारी देण्याचा विचार पक्का झाला.आणि बालकांचे व्यक्तिमत्व घडू लागले. उंच भरारी मारण्याकरिता पंखात शक्तीप्रदान करणाऱ्या संस्कार शिबिराचे उद्घाटन झाले.
आतापर्यंत अक्षर सुधार प्रकल्प, अरण्यवाचन,अवांतर वाचन, सुसंवाद, आरोग्य शिक्षण, वनभ्रमण, अरण्यवाचन, पर्यावरण जागृतीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा, भित्तीचित्रे, विदर्भ स्तरीय वक्तृत्व स्पर्धा, साने गुरूजी कथामाला, शिक्षण प्रकियेला दुषित करणाऱ्या शिकवणी वर्गाला विरोध, वाघाच्या संरक्षणासाठी परिसंवाद, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षणाचा हक्क, स्त्री-पुरूष समानता, पर्यावरण बचाव, प्रदुषण मुक्त होळी असे एक ना अनेक उपकम ‘संस्कार’ ने राबविले. या संस्कार शिबिराला नामवंत वक्ते व साहित्यिक राम शेवाळकर, टि.आर.के. सौमया,गोपीनाथ देवकर, मारूती चितमपल्ली, माधवराव डोंगरवार, सुब्बाराव, सुरेश द्वादशीवार, वामन तेलंग, कर्नल गुरूंग, राजन वेळुकर, शैलेश कुमार वर्मा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मेघा पाटकर, प्रा. अरूण रंधे या सह अनेक मान्यवरांनी संस्कार शिबिरांना भेटी दिल्या. सदर शिबिराच्या माध्यमातून तयार झालेले अनेक कार्यकर्ते शासकीय, निमशासकीय, राजकिय, सामाजिक, पत्रकारिता, शिक्षण तसेच खाजगी क्षेत्रात चमकत आहेत.
संस्कारच्या या प्रवासात अनेकजन आले. संस्कारमय होऊन योग्य मार्गी लागले. या चळवळीचे आधारस्तंभ घट्ट पाय रोवून नवनवीन कार्यकर्ते निर्माण करून चळवळीची प्रतिष्ठा जपत आहेत. गरीब- श्रीमंत, शिक्षित-अशिक्षितांची मुले- मुली या चळवळीत एकत्र येतात.स्पर्धेच्या युगात वावरत असतांना शहराबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या बाल मनावर योग्य संस्कार व्हावेत या उद्देशाने भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा, सिल्ली, कवलेवाडा, गुंथारा, बेटाळा, बेला, आंबाडी या ठिकाणी ध्येय वेडया
समाजसेवी विलास केजरकर यांनी २० वर्षापासून संस्कारचे निःशुल्क शिबिर घेणे सुरू केले आहे.
या ग्रामीण भागातील शिबिरात पर्यावरण संरक्षण, स्त्री- पुरुष समानता, योग- प्राणायाम, संगीतमय योगासने, झटपट चित्र, मुलांकरिता संवाद कौशल्य, प्रेक्षणीय स्थळांना भेटी, पोहण्याचे प्रशिक्षण, टाकाऊतून टिकाऊ, आई- वडिलांबद्दल कृतज्ञता, बीज संकलन, पक्षी बचाव, पाणी बचाव, वन्यप्राणी बचाव, आपत्ती व्यवस्थापन असे अनेक अभिनव उपक्रम राबविले जात आहेत.संस्कार शिबिरातून ग्रामीण भागातील बुद्धिमत्ता आता समोर येऊ लागली आहे. ग्रामीण भागातील संस्कारच्या शिबिरात आता स्पर्धा परीक्षेच्या तयारी सोबतच इंग्रजीचे ज्ञान व अन्य कौशल्याचे प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे. या संस्कार शिबिराने ग्रामीण भागात एक नवा जोश निर्माण केला आहे. त्यांच्या या नि:शुल्क तसेच समाजसेवी कार्याला जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.