हटके
वृद्ध दाम्पत्याने जागा पकडण्यासाठी दागिने आणि रोख असलेली बॅग एसटीत फेकली अन…..
लग्नसराईचा सिजन असल्याने एसटीत (बस) मध्ये प्रचंड गर्दी आहे. लग्नासाठी वेळेवर पोहचता यावे यासाठी लोकं वाट्टेल ते करून बस मध्ये जागा मिळविण्यासाठी द्रविडी प्राणायम करतात. जागा पकडण्यासाठी लोकं रुमाल, दुपट्टा आणि अन्य वस्तू खिडकीतून बस मध्ये ठेवतात.एका वृद्ध दाम्पत्याला यवतमाळ येथे लग्नाला जायचे असल्याने त्यांनी तुफान गर्दी असतांना सुद्धा जागा मिळावी यासाठी खिडकीतून आपली बॅग बस च्या आत फेकली. पण गर्दीमुळे त्यांना त्यात चढणे शकय झाले नाही. आणि बस निघून गेली. आता आपली बॅग गेली असे समजून त्यांना अश्रू अनावर झाले. या बाबतीत तेथे तैनात कर्मचाऱ्याला कळल्यावर त्याने संपर्क साधून त्याबाबद्दल माहिती मिळवली. बॅग सुरक्षित असल्याचे वृद्ध दाम्पत्याच्या जीवात जीव आला.
अकोला: उन्हाळ्याच्या सुट्ट्या अन् लग्न समारंभ असल्यानं स्थानकावर नागरिकांची प्रचंड गर्दी आहे. या गर्दीतून आपल्याला जागा मिळावी, यासाठी या दांपत्याने ४० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असलेली बॅग बसमध्ये खिडकीतून बसच्या सीटवर फेकली. परंतु, गर्दी असल्यामुळे वृद्ध दाम्पत्याला गाडीत चढता आले नाही. बॅग चोरीला गेल्याच्या संशयावरून वृद्ध दाम्पत्याची एकच रडारड सुरू झाली.
उन्हाळा त्यात लागलेल्या सुट्ट्या तसेच लग्न समारंभ यासाठी विविध ठिकाणी जाण्याकरता अकोल्याच्या एसटी बस स्थानकावर प्रचंड गर्दी आहे. दरम्यान महिलांना तिकीटमध्ये आरक्षण असल्यामुळे त्यांचीही मोठी झुंबड उडत आहे. अशात बसमध्ये जागा मिळवणं कठीण झालंय. म्हणून अनेक युक्त्या वापरल्या जातात कोणी चालकाच्या दरवाजातून तर काही पाठीमागील खिडकीतून आत प्रवेश करत असतानाचे चित्र गर्दीच्या वेळी दिसत आहे. काही जण खिडकीतून सीटवर रुमाल, टोपी, बॅग टाकून सीटवर पकडण्यासाठी धावपळ करतात.
एसटी बसमध्ये गर्दीमुळे असाच प्रकार सगळीकडे सुरू आहे. अकोला बस स्थानकावर जुमन्ना फय्याज हुसैन (वय ७७) आणि फय्याज हुसैन (वय ८३) हे दोघे मुलीकडे मालेगाव इथे गेले होते. रविवारी दुपारी ते बसने अकोल्यात आले. त्यांना यवतमाळला जायचं असल्यानं बसस्थानकावर आल्यावर यवतमाळ बसमध्ये जागा मिळवण्यासाठी त्यांनी जवळील ५० हजार रुपयांची रोख आणि पाच ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग खिडकीतून आत सीटवर टाकली.
परंतु प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यानं दोघांनाही गाडीत चढता आले नाही. काही प्रवाशांकडे सीटवरील बॅगेची विचारणा केली, त्यांना बॅग नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बॅग चोरीला गेल्याचा संशय आला. याची माहिती बसस्थानक पोलिस चौकीतील पोलीस कर्मचारी संतोष गावंडे यांच्या कानावर गेली. ठाणेदार घुगे आणि पोलिस कर्मचारी गावंडे यांनी तातडीने एसटी बस चालक, वाहकाशी संपर्क केला. त्यावेळी बॅग असल्याचा दुजोरा दिला. त्यानंतर जिल्ह्यातील मूर्तिजापूरवरून ही बॅग मागवण्यात आली. दरम्यान ही घटना सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांना कळल्यावर त्यांनी तातडीने सूत्रे फिरवली व काही तासांतच वृद्ध दाम्पत्याची बॅग परत आणून दिली. यानंतर वृद्ध दाम्पत्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.