हटके

हायप्रोफाईल कॉल सेंटर वर पोलिसांचा छापा ; 49 तरुण- तरुणींना अटक

Spread the love

विरार / विशेष प्रतिनिधी

                बेकायदेशीर रित्या चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल कॉल सेंटर वर पोलिसांनी छापा टाकून 49 तरुण तरुणींना अटक केली आहे. ही कारवाई  अर्नाळा सागरी पोलिसांनी केली आहे . यात 16 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या  गुप्त माहितीच्या आधारे अर्नाळा सागरी पोलिसांनी सदर फार्म हाऊसमध्ये छापा टाकला. या छाप्यात एकूण 49 तरुण-तरुणींना अटक केली आहे. आरोपींकडून 16 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस अधिक तपास करत आहेत

 आरोपींविरोधात भादवी कलम 419, 420, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43, 66, 66 (क), 66 (ड), 75 आणि भारतीय टेलिग्राम कायदा कलम 25 प्रमाणे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अर्नाळा सागरी पोलीस ठाणे हद्दीत राजोडी समुद्र किनाऱ्यावरील ओएसी पेंट बॉल अरेना या फॉर्म हाऊसमध्ये हे बोगस कॉल सेंटर सुरु होते. परराज्यातील तरुण तरुणी हे बोगस कॉल सेंटर चालवून, ऑस्ट्रेलियन स्थित एका बँकेच्या ग्राहकांची फसवणूक करीत होते. अर्नाळा सागरी पोलिसांना या बोगल कॉल सेंटरबाबत गुप्त माहिती मिळाली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close