हटके

7 वर्षाच्याव्वा डॉक्टर व्वा …..! मुलाच्या जखमेवर डॉक्टर ने लावले फेवीक्विक

Spread the love

गडवाल (तेलंगाणा ) / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                डॉक्टर ज्याला भूतलावरील देव असे संबोधले जाते. कारण याच व्यक्तीच्या प्रयत्नामुळे अनेक लोकांचे जीव वाचतात. त्यांच्या याच गुणामुळे त्यांना जमिनीवरील देव म्हणतात.पण काही व्यक्ती असे काही करू जातात की त्यांच्या कृत्यामुळे सर्व बिरादरी बदनाम होते. तेलंगाणाच्या गडवाल जिल्ह्यतून असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे.येथील एका डॉक्टर कडे जखमी अवस्थेत आलेल्या 7 वर्षाच्या मुलाच्या जखमेवर डॉक्टर ने फेवीक्विक लावल्याने या डॉक्टर वर कडक कारवाईची मागणी होत आहे.

तेलंगणमधील गडवाल जिल्ह्यात  मुलगा खाली पडल्याने जखमी झाला होता. त्याच्या डोक्यावर मार लागला होता. डॉक्टरने त्याची जखम बंद करण्यासाठी त्याच्यावर Feviquick लावून टाकलं.

मुलाचे वडील वामसी कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आणि त्यांची पत्नी सुनीता कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. यावेळी त्यांचा 7 वर्षांचा मुलगा प्रवीण चौधरीही त्यांच्यासोबत होता. लग्नाच्या ठिकाणी तो इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी खेळताना तो खाली पडला आणि कपाळावर डाव्या भुवईच्या वरती मार लागला.

यानंतर वामसी कृष्णा मुलाला घेऊन रेन्बो रुग्णालयात गेले. येथील डॉक्टर नागार्जून याने मुलाच्या जखमेवर उपचार करताना फेविक्विक लावून टाकलं. यानंतर मुलगा वेदना वाढल्याने अजूनच रडू लागला. यानंतर ते त्याला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात गेले. तिथे गेल्यावर त्यांनी डॉक्टरला आधीच रुग्णालयातील डॉक्टरने जखमेवर फेविक्विक लावलं असल्याची माहिती दिली.

यानंतर वामसी कृष्णा आणि त्यांच्या पत्नीने रेन्बो रुग्णालयातील डॉक्टराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला. डॉक्टरच्या बेजबाबदार उपचारामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता असं त्यांनी तक्रारीत सांगितलं आहे. दरम्यान ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर अनेकांना आरोग्य विभागाकडे या संबंधित डॉक्टरविरोधात कडक कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close