सामाजिक

श्री संताजी सभागृह निर्मिती साठी 1 कोटी निधी मंजूर

Spread the love

संताजी सभागृह निर्मिती साठी सर्व समाज बांधवांच्या प्रयत्नाला यश

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : आर्वी शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात तेली समाज असून समाजाचे एकही सार्वजनिक सभागृह वा समाज भवन नाही. त्यामुळे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात अडचणी निर्माण होतात. याबाबीचा विचार करून माजी नगराध्यक्ष प्रा.प्रशांत सव्वालाखे यांनी आ.दादारावजी केचे यांच्या मार्गदर्शनात आर्वी शहरात श्री संताजी सभागृह निर्माण व्हावे यासाठी त्यांच्या कार्यकाळात माजी आरोग्य सभापती प्रकाश गुल्हाने माजी नियोजन सभापती जगन गाठे, माजी आरोग्य सभापती सौ गंगा चकोले, माजी नगरसेवक राहुल गोडबोले, मिथुन बारबैले यांनी रवी गोडबोले ने सुचवलेली एक जागा निश्चित करून मा.श्री सुमित वानखडे यांचेकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु कोरोना काळ असल्याने विलंब झाल्यामुळे मा सुमितभाऊ वानखेडे (उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांचे स्वीय सहा.) यांचेकडे माजी नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सुदैवाने युतीचे सरकार आले. मध्यंतरी माजी नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांच्या नेतृत्वात सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत स्मरणपत्रही दिले होते. प्रशांत सव्वालाखे यांनी सातत्याने केलेला पाठपुरावा व सर्व समाज बांधवासह संताजी बहुद्देशीय संस्थेच्या नियोजनामुळे 1 कोटी रुपयांचा पहिला टप्प्याचा निधी मंजूर झाला आहे.

संताजी बहुउद्देशीय संस्था, आर्वीचे दिनेश भुसारी (अध्यक्ष), प्रकाश जयसिंगपूरे (उपाध्यक्ष), अरुण जयसिंगपूरे (सचिव), अनिल गुल्हाने (कोषाध्यक्ष), पूर्व अध्यक्ष अरुण कहारे, पूर्व सचिव प्रा.डॉ. सुरेंद्र गोठाणे, सतीश शिरभाते, प्रा. प्रशांत सव्वालाखे, अविनाश टाके, गुणवंत गुल्हाने, सुनील टाके, पंकज गोडबोले, राजेश गुल्हाने (टाके), मनोज आगरकर, भरत जयसिंगपुरे, प्रा. राजेश गुल्हाने तसेच श्री सुमित भाऊ वानखडे यांना निवेदन देताना उपस्थित डॉ. वसंतराव गुल्हाने, डॉ दिवाकर ठोंबरे, डॉ प्रकाश धांदे, जगन गाठे, प्रकाश गुल्हाने, अशोक जीरापुरे, अविनाश पंचगडे, संजय खुणे, पंकज गोडबोले, संदीप शिंगाने, सुमित शिंगाणे, अतुल जयसिंगपुरे, आशिष अजमीरे, कार्तिक काळमोरे, अमित भुसारी, मनोज टाके, वैभव हांडे, आशिष गुल्हाने, ज्ञानेश्वर जयसिंगपुरे, सुनील टाके, चेतन शिंगाणे, गुणवंतराव गुल्हाने, गणेश काळमोरे, ज्ञानेश्वर आसोले, , मनोज गोडबोले, शुभम लोखंडे, समर्थ खुणे, अनुप खुणे, विवेक कहारे, अनिल बिजवे, अमन लोखंडे, सागर शिंगाने, अमित शिंगाने, दिनेश गुप्ता, बाल्या शाहू, सुशील हांडे, जयेश गोडबोले तथा समाज बांधवांनी सुमितभाऊ वानखेडे यांचेसह खा रामदासजी तडस, आ. दादारावजी केचे, आ. रामदासजी आंबटकर, माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांचे आभार मानले.
श्री संताजी सभागृहाचा सर्वांच्याच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैवाहिक व इतर उपक्रमासाठी वापर होणार आहे. सुमित वानखडे यांचे सर्व समाज बांधवांनी आभार मानले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close