भ्रष्ट्राचार

अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळवीलेल्या बोगस अपंगांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करा

Spread the love

 

अमरावती विभागीय आयुक्त यांना अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदना द्वारे मागणी.

अमरावती दि 22/05/2024 :- अमरावती विभागामधील अनेक शासकिय / निमशासकिय कार्यालयामध्ये अपंग अनुशेष मधून बऱ्याच बोगस अपंगांनी अपंग नसतांना सुद्धा डॉक्टरांसोबत आर्थिक संगणमत करुन अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवून घेतले व त्या आधारे नियुक्त्या मिळविल्या असे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने आम्ही बोगस अपंग पकडो अभियान मागील एक वर्षापासून सुरु करुन शासकिय / निमशासकिय कार्यालयामध्ये स्वतः जावून चौकशी केली असता त्यामध्ये अनेक कर्मचारी हे बोगस अपंग कर्णबधीर व अंध, अल्पदृष्टी या प्रवर्गातील असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे या बोगस अपंग कर्मचाऱ्यांच्या बोगस अपंग पकडो अभियान अंतर्गत तक्रारी करण्यात आल्या असता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. तरी आपण आपल्या स्तरावर अमरावती विभागातील सर्व शासकिय / निमशासकिय कार्यालयामधील अपंग अनुशेष मधून नियुक्ती मिळविणाऱ्या अपंग कर्मचाऱ्यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी करण्याचे त्वरीत सक्तीचे आदेशीत करावे. असे निवेदन अपंग जनता दल सामाजिक संघटना म. रा.च्या वतीने मा. विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. निवेदन देते वेळी राजिक शाह, मयूर मेश्राम, राहुल वानखडे, शेख रुस्तम, राजेश पाटोकार, अनवर शाह, प्रमोद शेबे, राजेश वानखडे, किशोर नागदिवे, संदीप जैस्वाल मो. राजिक, मो. इलीयास या सह सर्व अपंग बांधव उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close