अपघात

पातूर येथील अपघातात 06 ठार; 03 गंभीर जखमी, मृतकांची ओळख पटली

Spread the love

आमदार सरनाईक यांच्या घरी शोककळा

अकोला : जिल्ह्यातील पातूर नजिक असलेल्या नवीन बाय पास वर दोन चारचाकी वाहनांच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाचे समोर आले असून, मृतकांची ओळख पटली आहे. दोन्ही वाहनांची अमोरसमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. यापैकी एक गाडी अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांच्या भावाची आहे. प्राप्त माहितीनुसार या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची ओळख पटली आहे. यामध्ये किरण सरनाईक यांचा वाहन चालक अमोल शंकर ठाकरे, पुतण्या रघुवीर अरुण सरनाईक वाशिम, मुलगी शिवानी अजिंक्य आमले आणि नात अस्मिरा अजिंक्य आमले नागपुर यांचा समावेश आहे. हे सर्व सरनाईक यांच्या कार मध्ये प्रवास करत होते. अपघाताची वार्ता पोहचताच आमदार सरनाईक यांच्या घरी शोककळा पसरली. दुसऱ्या कार मध्ये प्रवास करणारे आस्टुल – पास्टुल येथील सिद्धार्थ यशवंत इंगळे आणि सुमेध इंगळे यांचाही घटनास्थळी मृत्यू झाला असल्याचे कळते. तर इतर तीन जण गंभीर जखमी असून, त्यांचा अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. पियुष देशमुख, सपना देशमुख, श्रेयस सिद्धार्थ इंगळे अशी जखमीची नावे असल्याचे समजते. चारपदरी असलेल्या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली. त्यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपघाताची घटना कळताच पोलीसांनी लगेच घटनास्थळ गाठले. पंचनामा करून पुढील सोपस्कार पार पाडले. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. 108 चे चालक सचिन बरोबर डॉक्टर फैजान जगीदार, प्रफुल पाटील, दूलेखन युसुफ खान यांच्यासह गावकऱ्यांनी मदतकार्य केले.दरम्यान, अपघात स्थळी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी तात्काळ भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close