क्राइम

डिजे च्या तालावर नाचताना झाला वाद तरुणांच्या टोळक्याने तरुणाला केले जीवनातून बाद

Spread the love
विशेष प्रतिनिधी बुलढाणा 
  वर्तमान काळातील तरुणाई कडे धीर  (पेशन्स) नावाची गोष्ट आहे किंवा नाही हे कळायला मार्गच उरला नाही. कारण रोज वर्तमान पत्र किंवा सोशल मिडिया उघडला तर शुल्लक कारणावरून तरुणात वाद आणि धारदार शस्त्राने भोसकून तरुणाची हत्या अशा मथळ्याच्या बातम्या पाहायला मिळतात. शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घुण पणे हत्या केल्याची घटना खामगाव तालुक्यात घडली आहे. लग्नाची वरात सुरू असताना टोळक्याकडून तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. 

 

 

 

नेमकी घटना काय?


मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील बर्डे प्लॉट परिसरात एका लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नानिमित्त डीजे लावण्यात आला होता आणि अनेक तरुण गाण्यांच्या तालावर नाचत होते. मृत युवक शोएब खान अमीन खान (वय २३) हा देखील तिथे उपस्थित होता. नाचत असताना शोएबचा धक्का तेथील एका दुसऱ्या युवकाला लागला.

हा धक्का लागल्याच्या कारणावरून त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली. मात्र, काही वेळातच हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी संतापून शोएबवर धारदार शस्त्राने भीषण हल्ला केला.

हल्ला इतका भीषण होता की, शोएब गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर आरोपींनी तेथून पळ काढला. उपस्थितांनी शोएबला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. एका तरुण मुलाचा लग्नाच्या वरातीत असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. लग्नातील वादाचे रूपांतर हत्येत झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास सुरू केला असून संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close