सामाजिक

प्रशासनाचा ढिंम्म कारभार पांदण रस्ते मोकळे करण्याकरिता किशोर पटेल यांचे आमरण उपोषण

Spread the love

 

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

वाघोली ते दाभाडा पांदन रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याकरिता किशोर देवजी भाई पटेल हे गृहस्थ मागील सहा वर्षापासून महसूल

प्रशासनाकडे दाद मागत असून 25/ 2 / 2018 पासून हे प्रकरण महसूल न्यायालयाकडे न्यायप्रविष्ठ आहे प्रत्येक शेताला रस्ता असतो शासकीय रहदारीचा रस्ता उपलब्ध नसल्यास सरकारी पांदन
रस्ता असतो असा शासकीय नियम आहे आपल्या शेतातील शासकीय पांदण रस्ता मोकळा करण्याकरिता ही लढाई सुरू आहे
या प्रकरणात माननीय नायब तहसीलदार यांनी तीन वेळा आदेश दिल्यानंतरही
सदरहू पान्द्न रस्ता मोकळा करण्यात आलेला नाही
सहा वर्षाची लढाई तीन वेळा नायब तहसीलदारांचे आदेश तरीही परिस्थिती जैसे थे
यामागचे राजकारण काय हा संशोधनाचा विषय ठरत आहे
या प्रकरणात फार मोठे अर्थकारण शिजत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे शेवटी कंटाळून किशोर पटेल यांनी आमरण उपोषणाची नोटीस महसूल प्रशासन पोलीस स्टेशन विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्याकडे दिली आहे या सूचनेमध्ये सात दिवसाचे आत पांदन रस्त्यावरील अतिक्रमण न काढल्यास दिनांक 1/ 6 / 2023 पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याची सूचना त्यांनी दिली आहे या प्रकरणात काय होते याकडे सगळ्यांचे डोळे लागलेलेआहेत .

या प्रकरणात मंडळ अधिकारी दीरंगाईत करीत आहेत असा आरोप किशोर पटेल यांनी केला आहे महसूल प्रशासनाने तातडीने सरकारी पांदण रस्ता मोकळा करावा याकरिता इतके वर्ष लागावे ही शोकांतिका आहे भारत हा कृषिप्रधान देश आहे या कृषीप्रधान देशात एका शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातील पांदण रस्ता मोकळ्या करण्याकरिता सहा सहा वर्षे वाट बघावी लागते यापेक्षा दुसरे दुर्दैव काय असा प्रश्न परिसरात चर्चेला जात आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close