धोत्रा व मोगरा गट ग्राम पंचायत मधील विविध विकासासाठी 2 कोटी 82 लक्ष रुपये मंजुर
लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न.
*चांदुर रेल्वे ता. प्र. प्रकाश रंगारी
चांदूर रेल्वे तालुक्यातील गट ग्रा. पं. धोत्रा अंतर्गत मोगरा या गावांच्या विकासासाठी धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रतापअडसड यांच्या विशेष प्रयत्नाने बबलु वासनिक यांचे शेतापासून ते भवानी माता मंदीरा पर्यंत पांधण रस्ता करीता 20 लक्ष तर हनुमान मंदीर सभागृह बांधकामा साठी 9 लक्ष तसेच दत्त मंदीरसभागृह बांधकाम १२ लक्ष रुपये धोत्रा ते किर जवळा रस्ता खडीकरण करणे तसेच धोत्रा गट ग्रामपंचायत मध्ये वानखडे यांच्या शेतापासून किरजवळा धोत्रा डांबरीकरण रस्त्यापर्यंत पांधण रस्ता २० लक्ष,नितीन भालेराव यांचे शेता पासून ते भाष्कर गजभिये यांचे शेता पर्यंत पांधण रस्ता,विजय जगताप यांचे शेतापासून ते सुभाष वानखडे यांचे शेतापर्यंत पांधणरस्ता 20 लक्ष संजय वासनिक यांचे शेतापासून ते हरिश्चंद्र गोंडाणे यांचे शेतापर्यंतपांधण रस्ता २० लक्ष,सुभाष वानखडे यांचे शेतापासून ते मोरेश्वर चेंडकापुरे यांचे शेतापर्यंत पांधण रस्ता20 लक्ष, दिलीप वानखडे यांचे शेतापासून ते श्याम राऊत यांचे शेतापर्यंत पांधण रस्ता २० लक्ष, श्याम राऊत यांचे शेतापासून किरजवळा डांबरीकरण रस्त्यापर्यंत पांधण रस्ता२०लक्ष,धोत्रा गावठाण ते बाबाराव धोटे यांच्या शेता पर्यंत पांधण रस्ता, किरजवळा ते मधुकर वानखडे यांचे शेतापर्यंत पांधण रस्ता २० लक्ष,कल्पना वाहणे यांच्या शेतापासून ते अॅड वानखडे यांच्या शेतापर्यंत पांधण रस्ता २० लक्ष,सतिश कावळे यांचे शेतापासून ते नितीन भालेराव यांचे शेतापर्यंत पांधण रस्ता २० लक्ष,प्रकाश रंगारी यांच्या शेतापासून ते मधुकर रंगारी यांच्या शेतापर्यंत पांधण रस्ता २० लक्ष धोत्रा येथे सभागृह बांधकाम लोकार्पण सोहळा १५ लक्ष असा एकूण 2 कोटी 82 लक्ष रूपयांचा निधी मंजूर करून भुमिपुजन व लोकार्पण सोहळा गुरूवार1ऑगस्ट रोजी लोकप्रिय आमदार प्रताप अरुण अडसड, रावसाहेब रोठे विधानसभा प्रमुख) डॉ.अर्चनारावसाहेबरोठे,बबन गावंडे, तालुका अध्यक्ष भा.ज.पा, सविता ठाकरे तालुका अध्यक्ष महिला आघाडी, प्रशांत भेंडे, सभापती पं.स.चांदूर रेल्वे,शुभांगी अ. खंडारे, उपसभापती पं.स.चां.रे,आशुतोष गुल्हाने, संचालक कृ.उ.बा.स.चां.रे. संदीप सोळंके, जिल्हा सचिव भा.ज.पा,रोशन खेरडे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष,प्रशांत देशमुख अध्यक्ष संजय गांधी श्रावण बाळ योजना, गोपाल बकाले अध्यक्ष आत्मा समिती, मुरलीधर मुंधडा, माजी अध्यक्ष संजय गांधी श्रावण बाळ योजना,समिर भेंडे, ओ.बी.सी. मोर्चा विधानसभा प्रमुख प्रदीप जळीत, तालुका सरचिटणीस युवा समाज सेवक पप्पू भालेराव,अक्षय गडलिंग ,रमेश पाटील, रणजित पाटील,वैभव कछवे,सोमकुवर,बाल्या थेटे अॅड वानखडे तसेच धोत्रा व मोगरा येथील गट ग्राम पंचायत मधिल प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.