हटके

पाण्याखाली शार्क माशांच्या गराड्यात त्याने तिला केले प्रपोज

Spread the love

लंडन / नवप्रहार डेस्क 

                 सध्या प्रेमात असलेल्या व्यक्तीला आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रपोज करण्याचे ट्रेंड जबर वाढलंय. कोणी खेळाच्या मैदानात, कोणी विमानात तर कोणी अन्य ठिकाणी आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करून जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. अशाच एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला पाण्याखाली शार्क माशांच्या गराड्यात प्रपोज केलय. या प्रपोज ची चांगलीच चर्चा रंगलीय. 

 ब्रिटनमधील या तरुणाने शार्क माशांच्या जवळ जाऊन प्रेयसीला प्रपोज केलं. विशेष म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडला शार्क खूप आवडतात. त्यामुळे त्याने पाण्याखाली शार्क मासे आजूबाजूला असताना प्रेयसीला प्रपोज केलं आहे. ही अनोखी घटना ब्रिटनमधील लिंकनशायर येथील स्केग्‍नेस ॲक्वॅरियममध्ये घडली. बकिंघमशायर येथील जेम्स वॉल्श आणि त्याची गर्लफ्रेंड पेगी कूक हे शार्कसोबत ड्रायव्हिंगचा अनुभव घेण्यासाठी गेली होती. त्याच वेळी जेम्सने पेगीला सरप्राइज देण्याचे ठरवले आणि १० सप्टेंबरला पाण्याखाली त्याने लग्‍नासाठी असे प्रपोज केले. जेम्सने हा प्लॅन अचानक केला नव्हता. त्याने प्रपोज करण्याआधीच ॲक्वॅरियमच्या प्रशासनाशी संपर्क साधला आणि प्लॅन तयार केला.

पाण्याखाली समोर एक खास बोर्ड ठेवला. त्यावर ‘वुईल यू मॅरी मी?’ असे लिहिले होते. तिने आश्चर्याने स्कूबा मास्कवर हात ठेवला आणि नंतर हाताच्या इशाऱ्याने होकारही दिला. त्यानंतर दोघांनी पाण्याखालीच एकमेकांना मिठी मारली आणि रिंगही घातली. जेम्सने प्रपोज करण्यासाठी हीच जागा का निवडली, यामागेही खास कारण आहे. पेगीला शार्क अतिशय आवडतात आणि तिला शार्कसोबत स्कूबा डायव्हिंग करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिच्या आवडीच्या प्राण्यांच्या मध्येच तिला प्रपोज करण्याचा जेम्सने निर्णय घेतला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close