माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत खिरगव्हाण ग्रामपंचायत येथे वसुंधरा शपध
अंजनगाव सुर्जी — माझी वसुंधरा उपक्रमा अंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खिरगव्हाण समशेरपुर ग्रामपंचायत कार्यालय तर्फे विविध उपक्रम राबविल्या जात आहे. त्याच पैकी एक भाग म्हणुन वसुंधरा शपध जिल्हा परीषद प्राथमिक शाळा खिरगव्हाण येते घेण्यात आली. यामध्ये प्लाँस्टीक न वापरणे,जल,वायु प्रदुषण न करणे, झाडे लावणे ईत्यादी विषयाची शपध देण्यात आली.यामध्ये शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शपध देतेवेळी सौ सुजाता दिपक सरदार सरपंच, श्री नरहरी रायपुरे उपसरपंच,ग्रा.पं.खिरगव्हाण, हर्षेल काकड ,गजानन घोगरे सदस्य, ग्रा,पं. खिरगव्हाण, शंकरराव राठोड, मुख्याध्यापक, डायलकर सर सहा.शिक्षक,नंदकिशोर डेरे,गौरव घोगरे,कैलास कुलट,पंकज घोगरे,सौ प्रतीभा धनराज घोगरे, कु. प्रतीभा बाबुराव घोगरे,अंगणवाडी सेविका,सौ. गावंडे सौ राऊतकर व रत्नदिप घोगरे, रोजगार सेवक अजय बाविस्कर ग्रा.पं. कर्मचारी ईत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.