हटके

नशेत असलेल्या प्रवाश्या सोबत रिक्षाचालकाचे अनैसर्गिक कृत्य

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क 

दारूच्या नशेत असलेल्या प्रवाश्याने ऑटो चालकाला अनेक ठिकाणी फिरविल्यानंतर भाड्याचे 250 रु. ऐवजी प्रवाश्याने 100 रु दिल्याने संतापलेल्या ऑटो चालकाने त्याला निर्जनस्थळी नेट त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याला एटीएम मध्ये नेऊन 200 रु काढायला लावले. त्यानंतर त्याचा मोबाईल आणि एटीएम कार्ड ठेवूंन घेत त्याला परत पाठवले होते.” मंगळवारी पीडित व्यक्तीने ठाणे गाठत पोलिसांपुढे कैफियत मांडली. आणि मला या गोष्टीची लाज वाटत आहे. मला माझा मोबाईल आणि एटीएम कार्ड द्या अशी विनवणी केली.

शनिवारी रात्री ही घटना घडली. त्यावेळी दारुच्या नशेत असलेला प्रवाशी घाटकोपर येथून रिक्षात बसला. हा प्रवासी रिक्षा चालाकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरवत होता. कुठे जायचय, हे सांगण्याच्या स्थितीमध्ये तो नव्हता.

“तासाभरानंतर पीडित प्रवासी रिक्षातून उतरला. ड्रायव्हरने त्याला भाड्यापोटी 250 रुपये देण्यास सांगितले. प्रवाशाने त्याच्या हातावर 100 रुपये ठेवले. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झालं. आरोपी रिक्षाचालकाने प्रवाशाला जबरदस्तीने रिक्षात बसवलं. त्याला निर्जनस्थळी एका गार्डनमध्ये घेऊन गेला. तिथे त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

त्यानंतर ड्रायव्हरने पीडित प्रवाशाला पुन्हा रिक्षात बसवलं व त्याला एटीएम सेंटरमध्ये घेऊन गेला. तिथे त्याला 200 रुपये काढायला लावले. पीडित व्यक्तीचा मोबाइल फोन आणि एटीएम कार्ड काढून घेतलं. त्यानंतरत त्याला तिथून घरी जाऊ दिलं, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

मंगळवारीपी पीडित पोलीस ठाण्यात गेला. त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मला फक्त माझा मोबाइल फोन हवा आहे. घडलेल्या घटनेमुळे आपल्याला लाज वाटत असल्याच त्याने पोलिसांना सांगितलं. मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवून आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close