शाशकीय

गरजूवंत घरकुल लाभार्थ्यांना डावलून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांची निवड

Spread the love

 

गोर सेना जिल्हाध्यक्ष वर्धा यांचा नेतृत्वात गरजूवंत घरकुल धारकांना घरकुल द्या असे पंचायत समिती आर्वी यांना दिले निवेदन

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : आज दिनांक 22/2/24 ला माननीय राठोड साहेब व गणेश नरवाडे साहेब पंचायत समिती आर्वी यांना ज्ञानेश्वर राठोड गोर सेना जिल्हाध्यक्ष वर्धा यांचा नेतृत्वात निवेदन देण्यात आले.या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तालुका निहाय प्राप्त उद्दिष्ट प्रमाणे घरकुल लाभार्थ्यांची निवड ही काही ठिकाणी चुकीची झालेली असून पात्र लाभार्थ्यांना डावलून हित संबंध साधून अपात्र व गरजू नसलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे गरजू व पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले असून शासनाच्या नियमाचे पायमल्ली झालेली आहे तरी आपण या बाबीची गंभीर दखल घेऊन अपात्र लाभार्थ्याचे निवड रद्द करून गरजू व पात्र लाभार्थ्यांची निवड 7दिवसात करण्यात यावी अन्यथा 7 दिवसा नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोर सेना वर्धा जिल्हाध्यक्ष यांनी दिला आहे. निवेदनात असे सुद्धा नमूद करण्यात आले आहे की 1. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची झालेली निवड रद्द करून अति गरजू पात्राची निवड करणे 2.वसंत चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत प्राप्त लाभार्थ्यांना तत्काल 7 दिवसाच्या आत निधी मंजूर करून त्यांना तत्काळ वर्ग करण्याबाबत यशवंत चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तीन ग्रामपंचायत कवाडी येथे वीस ला बांधांची वसाहत निर्माण करणे क्रमांक चार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत अतिक्रमण करून राहणाऱ्या लाभार्थ्यांना त्याच ठिकाणची जागा देऊन घरकुल मंजूर करणे मोदी नंबर क्रमांक पाच मोदी आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाची चौकशी करणे क्रमांक सहा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पपत्र ड मधील प्राप्त लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून त्यांना तत्काल सात दिवसाच्या आत नेते उपलब्ध करून पात्राला बांधांच्या खात्यात तत्काल वर्ग करणे बाबत उपयुक्त संदर्भीय विषयाने आपणास निवेदन देण्यात आले हे सर्व बाबीर सात दिवसात हे सर्व बाबी सात दिवसात सोडवल्या नसल्यास सात दिवसांनी तिरवळ आंदोलन करण्यात येत असा इशारा गोरसेना जिल्हाध्यक्ष आर्वी यांच्याकडून देण्यात आला या निवेदन देताना दर्पण टोकसे वंचित बहुजन युवा आघाडी वर्धा उपाध्यक्ष नितीन आष्टीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी सेल चे आर्वी विधानसभा अध्यक्ष चंदू भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ता कैलास भाऊ जाधव गोरसेना तालुका अध्यक्ष संजय जाधव तालुका संघटक गोरसेना निखिल राठोड जिल्हा सचिव बादल राठोड तालुका उपाध्यक्ष कैलास राठोड चिरंजीव चव्हाण सचिन राठोड मुकेश राठोड विकी राठोड अजय जाधव अजय राठोड राहुल जाधव संजय जाधव आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close