नूतन दुर्गा उत्सव समितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळा संपन्न
चांदूरबाजार / प्रतिनिधी
नूतन दुर्गा उत्सव समिती सरदार वल्लभाई पटेल चौक चांदूरबाजार या वर्षी मंडळाचे ५० वे वर्ष असल्याने सुवर्ण मोहत्सवनिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. १९७३ साली प्रथम आई दुर्गभवानीची स्थापना मंडळात करण्यात आली होती आणि अविरतपणे आजही करण्यात आली. या अनुषंगाने ज्या कार्यकर्त्यांनी १९७३ ला मंडळाची सुरुवात केली त्यांचा या वेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मंडळाचे सदस्य मा. पुष्पक श्रीरामजी खापरे याना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते मा.प्रभाकरराव मोहोड,मा.प्रा.श्रीरामजी खापरे, मा.चंद्रशेखरजी तातेड, मा.पुरषोत्तमजी दवे, मा.मनोहरजी गुल्हाने,मा.प्रभाकरजी शिरभाते, मा.मधुकरजी सुलताने, मा.देवीदासजी शेरेकर, मा.अशोकजी डांगरे, मा.मनोहरजी सुलताने मा.सुरेशजी बिजवे, मा.सुरेशजी देशमुख, मा.प्रकाशजी रघुवंशी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व आजी माजी कार्यकर्ते,परिसरातील महिला मंडळी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन इंद्रनिल देशमुख तसेच आभार प्रदर्शन अनिकेत देऊळकर यांनी केले आणि अतिशय उत्साहात सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ लोकांनी सुद्धा मंडळाचे मनापासून आभार मानले.