राजकिय

अजित पवार यांच्या कडून देवेंद्र भुयार यांच्या नावाची घोषणा होताच भाजापात  अस्वस्थता 

Spread the love
इच्छुक आणि नाराज भाजपा नेते शरद पवार गटाच्या संपर्कात 
मोर्शी / ओंकार काळे 
               आगामी काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक लागणार असल्याने महविकास् आघाडी आणि महायुतीतील सगळेच पक्ष कामाला लागले आहेत . कोणता पक्ष यात्रा तर कोणता पक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
                         महायुतीत असलेल्या अजित पवार यांनी अमरावती दौऱ्यावर असताना  मोर्शी – वरूड या मतदार संघातून अपक्ष म्हणून  निवडून आलेले आणि नंतर अजित पवार गटाला समर्थन घोषित करणारे आ. देवेंद्र भुयार हेच आमचे उमेदवार असतील अशी घोषणा केल्याने भाजपा कडून लढण्यास इच्छुक असलेले नेते अस्वस्थ  झाले आहेत. महायुतीचा एक भाग असलेला  राष्ट्रवादी अजित पवार गटाला जर ही जागा सुटली तर आपले काय ? असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
लढण्यास इच्छुक शरद पवार गटाच्या हर्षवर्धन देशमुखांच्या संपर्कात –  ही जागा अजित पवार यांना सुटली तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही ही चिंता सतावत असलेल्या इचुक्कांनी आता हर्षवर्धन देशमुख यांच्याशी जवळीक वाढवल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते सहकार नेते म्हणून ओळख असलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे बोलल्या जात आहे.
भैय्या साहेब स्वतः लढण्यास इच्छुक – एकीकडे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन उर्फ भैय्या साहेब देशमुख यांच्या संपर्कात आहे तर  दुसरीकडे भैय्यासाहेब यांनी स्वतः ते निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत दिले आहे.
इचुकांचा हिरमोड – मोर्शी मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गट समर्थित आ. देवेंद्र भुयार यांना तिकीट मिळाली तर आपण शरद पवार गटाकडून उमेदवारी मागू या आशेवर असलेल्या इच्छुकांचा भैय्या साहेब देशमुख यांनी लढण्याची ईच्छा असल्याचे सांगितल्यावर हिरमोड झाला आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close