हटके
भंडारा / नवप्रहार मीडिया
प्रेयसी सोबत लॉज वर मुक्कामी असलेला तरुण सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने शहरात खळबळ माजली आहे. खोलीत शक्तिवर्धक गोळ्या आढळून आल्याने शक्तिवर्धक गोळ्यांचे अतिसेवन केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. सत्य काय ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळणार आहे. शहर पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मृत तरुणाचे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील एका तरुणीवर प्रेम होते. दोघेही 19 ऑगस्ट रोजी एकमेकांना भेटण्यासाठी भंडारा येथे आले होते. दोघेही दिवसभर शहरात फिरायला गेले होते. संध्याकाळी खरेदी केल्यानंतर त्यांनी लॉजवर एकत्र रात्र काढली. त्यानंतर मुलीने सकाळी मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात येताच तरुणीने तातडीने लॉजच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
त्यानंतर तरुणाला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तरुणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तरुणाच्या रक्ताचे नमुने अधिक तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी सांगितले. ज्या खोलीत तरुणाचा मृतदेह सापडला, त्या खोलीत शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या सापडल्या आहेत. त्यापैकी 100 मिलीग्रॅमच्या दोन गोळ्या तरुणाने घेतल्या असाव्यात, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |