निंभारी येथे जिजाऊ ब्रिगेडची शाखा स्थापन
ता.प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी
गुरूवार दि.१०/०८/२०२३ रोजी ग्राम निंभारी येथे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेची नव्याने स्थापन करण्यात आली. गेल्या पंचवीस वर्षापासून अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये जिजाऊ ब्रिगेड विविध स्तरावर सामाजिक काम करत आहे.त्यामुळे गाव खेड्यांमध्ये महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण होत आहे. महिलांच्या डोक्यातील अंधश्रद्धा बाहेर काढून,त्यांचा सर्वांगीण
विकास साधणे, त्यांना स्वावलंबी बनविने तसेच त्यांच्यात महापूरूषांचे विचार रुजविणे यासाठी जिजाऊ ब्रिगेड काम करत आहे. महिलांवर होत असलेले अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणे तसेच त्यांच्या हक्क व न्यायासाठी लढा देणे हे महत्त्वाचे कार्य जिजाऊ ब्रिगेड द्वारा करण्यात येते. यासाठी *गाव तिथे शाखा* हे व्रत हाती घेऊन जिजाऊ ब्रिगेड तालुक्यातील प्रत्येक गावात जिजाऊ ब्रिगेडची शाखा स्थापन करत आहे.
याच उद्देशाने निंभारी येथे ही शाखा स्थापन करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष सीमा बोके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अंजनगाव सुर्जी तालुक्याच्या अध्यक्ष प्रिया गायगोले यांच्या अध्यक्षतेखाली व ता.सहसचिव शुभांगी गावंडे यांच्या संपर्कातून ही शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी निंभारी ग्रामपंचायत सदस्या जया रामेश्वर धोटे यांची निंभारी शाखेच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर
ममता सुधीर खंडारे – उपाध्यक्ष
योगिता प्रशांत गुळदे – उपाध्यक्ष
भाग्यश्री अमोल चव्हाण – सचिव
अर्चना भानुदास धोटे – कार्यध्यक्षा
दिपाली रावसाहेब साखरे – संघटक
ज्योती नितीन धोटे – कोषाध्यक्ष
मीना सुनील हिवराळे – सहसंघटक
शारदा केशव अरबट – सदस्य
दिपाली विशाल मिसळकर – सदस्य
अशी संपूर्ण कार्यकारीणी तयार करून त्यांना जेष्ठ पदाधिका-यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अंजनगाव सुर्जी वरून विजया तुरखडे, सारीका धामोळे,अर्चना तुरखडे,शितल बोके,सुमित्रा ढगे
निंभारीच्या ग्रामपंचायत सदस्य शारदा अरबट,अनिता गजबे,उद्योजीका मंदा चवरे तसेच गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सर्व नियोजन व आयोजन नवनिर्वाचीत अध्यक्षा जया धोटे यांनी त्यांच्या निवासस्थानी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मीना धोटे,प्रास्ताविक ज्योती धोटे तर आभार जया धोटे यांनी मानले.