क्राइम

पाचपावली पोलीसांची कामगिरी : जबरी चोरी करणारा विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

Spread the love

वाहन चोरीचे ०४ गुन्हे उघडकीस

प्रतिनिधी अमित वानखडे

दिनांक ०६.जुलै २०२३ चे ०९.३० वा. चे सुमारास फिर्यादी नबीला उमेर शेख वय २९ वर्ष, रा. दिक्षीत नगर, कामगार नगर चौक येथे किरायाने, नागपूर हया थ्रिव्हीलर ॲटो मध्ये बसुन आपले कामाचे ठिकाणी रामदासपेठ येथे जात असतांना, पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत, खालसा गेट, कामठी रोड जवळ त्या आपले फोनवर बोलत असतांना अॅटोचे पाठीमागुन एक काळया रंगाची स्प्लेंडर गाडीवर दोन अनोळखी इसमांनी येवुन फिर्यादीचा मोबाईल किमती अंदाजे १५,०००/- रू चा हिसकावुन नेला. फिर्यादीचे अशा रिपोर्टवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे कलम ३९२, ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस ठाणे पाचपावली येथील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून विधीसंघर्षग्रस्त बालक वय १५ वर्ष यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथिदार विधीसंघर्षग्रस्त बालक याचे सोबत मिळुन केल्याची सांगीतले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाणे शांतीनगर, अंबाझरी, सदर व तहसिल हद्दीतुन वाहन चोरी केल्याचे सांगीतले विधीसंघर्षग्रस्त बालका जवळुन गुन्हयातील हिसकावुन नेलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर प्लस गाडी तसेच चोरी केलेले वाहन, ०१ यामाहा, ०१ जुपीटर गाडी, ०१ अॅक्टीव्हा, ०१ स्प्लेंडर गाडी असे एकुण ०५ वाहन व एक मोबाईल असा एकुण २,५०,००० /- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी मा. श्री. गोरख भामरे पोलीस उप-आयुक्त (परि क. ३), श्री नरेन्द्र हिवरे सहा. पोलीस आयुक्त लकडगंज विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव जाधव, पोनि (गुन्हे) महेन्द्र आंभोरे, पोहवा दिलीप पवार, नापोअ. प्रकाश पखान, वासुदेव जयपूरकर, अंकुश राठोड, गणेश ठाकरे, पोअ हितेश खरखुंडे यांनी केली..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close